पावणेदोन लाख भाविक हज यात्रेला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 02:16 AM2018-04-23T02:16:41+5:302018-04-23T02:16:41+5:30

४७ टक्के महिलांचा समावेश : हज यात्रेचे अनुदान बंद झाल्यानंतरची पहिली यात्रा; मेहरमशिवाय १,३०० महिला जाणार

Hundreds of pilgrims from Pavadon to Haj Yatra | पावणेदोन लाख भाविक हज यात्रेला जाणार

पावणेदोन लाख भाविक हज यात्रेला जाणार

Next

मुंबई : हज यात्रेचे सरकारी अनुदान बंद झाल्यानंतर, प्रथमच होत असलेल्या यात्रेला भारतातून यंदा १ लाख ७५ हजार २५ यात्रेकरू जाणार आहेत. यात महिलांचे प्रमाण ४७ टक्के आहे. मेहरमशिवाय (रक्ताच्या नात्यातील पुरुषाच्या सोबतीशिवाय) हजला जाण्यास परवानगी मिळाल्यानंतर, १,३०० महिला हजला जात आहेत. महिला यात्रेकरूंची काळजी घेण्यासाठी प्रत्येक विमानामध्ये १३ महिलांचे विशेष पथक कार्यरत राहील, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रविवारी हज हाउस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हज यात्रेकरूंच्या मदतीला जाणाऱ्यांच्या प्रशिक्षण केंद्राला मुख्तार अब्बास नक्वी यांनी या वेळी भेट दिली. हजचे अनुदान बंद झाले असले, तरी त्याचा फटका यात्रेकरूंना बसणार नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, प्रत्यक्षात यात्रेकरूंना १८ टक्के जीएसटी व सौदी अरेबियामध्ये ५ टक्के वॅट द्यावा लागणार असल्याने, यात्रेकरूंना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. यंदापासून महिला हज यात्रेकरूंच्या मदतीसाठी महिलादेखील जाणार आहेत. अजिजिया गटातून मुंबईतून जाणाºया यात्रेकरूंना प्रति व्यक्ती २ लाख रुपये भरावे लागणार आहेत. त्यापैकी ८० हजार रुपयांचा पहिला हप्ता हज समितीने यात्रेकरूंकडून जमा केला आहे. हज यात्रेला जाण्यासाठी देशाचा कोटा वाढविण्यात केंद्र सरकारला सलग दुसºया वर्षी यश मिळाल्याचे नक्वी म्हणाले.
यंदा हज यात्रेसाठी एकूण ३ लाख ५५ हजार ६०४ अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये पुरुषांचे अर्ज १ लाख ८९ हजार २१७ व महिलांचे १
लाख ६६ हजार ३८७ अर्ज प्राप्त झाले. हज समितीच्या माध्यमातून १ लाख २८ हजार भविक, तर खासगी टुर आॅपरेटरच्या माध्यमातून ४७ हजार २३ भाविक हजला जाणार आहेत. विमान भाड्यापोटी गतवर्षी विमान कंपन्यांना १ लाख २४ हजार ८५२ प्रवाशांसाठी १ हजार ३० कोटी रुपये देण्यात आले होते. यंदा १ लाख २८ हजार प्रवाशांसाठी ९७३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

हजला जाणाऱ्यांमध्ये मुंबईहून १४,२००, औरंगाबाद येथून ३५०, दिल्ली येथून १९ हजार, कोचिनमधून ११,७००, लखनऊ येथून १४,५००, कोलकाता येथून ११,६१०, अहमदाबाद येथून ६,७००, बेंगळुरू येथून ५,५५०, भोपाळ येथून २५४, चेन्नई येथून ४,०००, जयपूर येथून ५,५००, गया येथून ५,१४०, गोव्यातून ४५०, गुवाहाटी येथून २,९५०, नागपूर येथून २,८००, हैद्राबाद येथून ७,६००, मेंगलोर येथून ४३०, रांची येथून २,१००, श्रीनगर८,९५०, वारणसी येथून ३,२५० यात्रेकरूंचा समावेश आहे.

Web Title: Hundreds of pilgrims from Pavadon to Haj Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.