मराठी मतदार मुंबईत कितपत निर्णायक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 06:19 AM2019-04-21T06:19:50+5:302019-04-21T06:20:20+5:30

३७% मतांवर जिंकणे कठीण; सर्व मतदारसंघांत ‘सिंगल लार्जेस्ट’ मतदान

How much Marathi voters are decisive in Mumbai? | मराठी मतदार मुंबईत कितपत निर्णायक?

मराठी मतदार मुंबईत कितपत निर्णायक?

Next

- यदु जोशी 

मुंबई : राजधानी मुंबईत मराठी मतदार आजही निर्णायक आहेत का? त्यांचा एकूण टक्का किती आणि आज केवळ मराठी मतांच्या भरवशावर निवडून येणे शक्य आहे का? या प्रश्नांची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा चर्चा आहे. मुंबईत आज मराठी मतदार ‘सिंगल लार्जेस्ट’ आहे, पण केवळ मराठी मतांच्या आधारे निवडून येणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे शिवसेनेसारख्या मराठी बाणा दाखविणाऱ्या पक्षालादेखील अन्य समुदायांचा आधार घ्यावा लागत आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत मिळून एकूण मतदारसंख्या ९४ लाख ९६ हजार ६०५ इतकी आहे. त्यात मराठी आणि अन्य धर्मीय व समाजाची संख्या किती? याची सरकारी आकडेवारी अर्थातच उपलब्ध नाही. मात्र, भाजप, काँग्रेससाठी प्रचाराची रणनीती ठरविणाºया व्यक्तींकडून ही आकडेवारी उपलब्ध झाली. त्यानुसार, मराठी मते ३५ लाख इतकी आहेत. एकूण मतदारसंख्येचा विचार करता ही टक्केवारी ३६.८४ इतकी आहे. गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, मुस्लीम, ख्रिश्चन व अन्य समाज यांच्या मतांची बेरीज केल्यास मराठी मतदार अल्पमतात आहेत.

दक्षिण मुंबईत मराठी मतदारांची संख्या ५ लाख २५ हजार इतकी आहे, पण या मतदारसंघात मुस्लीम (३ लाख), गुजराती, जैन (२ लाख), उत्तर भारतीय (१ लाख, ५५ हजार) अशी लक्षणीय संख्या आहे. साडेपाच लाख मराठी मते असलेल्या दक्षिण-मध्य मुंबईत मुस्लीम (२.३७ लाख), उत्तर भारतीय (१.६४ लाख), दाक्षिणात्य (८८,८७८) व गुजराती-राजस्थानी (८७ हजार) अशी उल्लेखनीय (पान १० वर)

मुंबईत मराठी मतदारांचा टक्का पूर्वीपासूनच कमी आहे. इतर प्रांतीय
येथे येत गेले आणि मराठी मतदार कमी होत गेला, तरीही मुंबईचे राजकारण आजही मराठी माणसांभोवतीच फिरते. त्यांची भूमिका निर्णायकच आहे आणि राहील. देशातील सर्वच कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये स्थानिकांची संख्या कमी होत आहे. - खा. संजय राऊत, शिवसेनेचे प्रवक्ते

Web Title: How much Marathi voters are decisive in Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.