जेजे रुग्णालयाचे अजय भंडारवार यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:39 AM2019-04-21T01:39:01+5:302019-04-21T01:39:29+5:30

अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टीनल अ‍ॅण्ड एण्डोस्कोपिक सर्जन्स संस्थेकडून दखल

Honor of Ajay Bhandarwar of JJ Hospital | जेजे रुग्णालयाचे अजय भंडारवार यांचा सन्मान

जेजे रुग्णालयाचे अजय भंडारवार यांचा सन्मान

googlenewsNext

मुंबई : जेजे रुग्णालयातील डॉ. अजय भंडारवार यांनी एका २२ वर्षीय तरुणीवर अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वी केली होती. या शस्त्रक्रियेत तरुणीच्या लहान आतड्यातील तब्बल ४१ गाठी आतड्यांना कोणताही धक्का न पोहोचविता हळुवारपणे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने इण्ट्रा आॅपरेटिव्ह पॉलीपेक्टॉमी पद्धतीने शस्त्रक्रिया करून काढल्या होत्या. या अत्यंत जटिल आणि दुर्मीळ शस्त्रक्रियेसाठी डॉ. भंडारवार आणि त्यांच्या चमूचा सोसायटी आॅफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टीनल अ‍ॅण्ड एण्डोस्कोपिक सर्जन्स संस्थेकडून सन्मान करण्यात आला आहे.

जेजे रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. अजय भंडारवार हे प्रमुख असून डॉ. गिरीश बक्शी, डॉ. आर. आर. कुलकर्णी, डॉ. अमोल वाग, डॉ. एहम अरोरा, डॉ. शेखर जाधव, डॉ. अमरजीत तंदूर, डॉ. प्रियंका साहा, डॉ. रुचिरा अरोरा, डॉ. सौम्या चतनाळकर, डॉ. जय राठोड, डॉ. निदिशा सिधवानी, डॉ. शिवांग शुक्ला, डॉ. उमंग शांडिल्य यांचादेखील या शस्त्रक्रियेत सहभाग होता.

नुकत्याच एका कार्यक्रमात ‘सेजेस पुरस्कार’ने जेजे रुग्णालयाला सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी जगभरातून १०० देशांच्या शस्त्रक्रिया कामगिरी आल्या होत्या. गेल्या वर्षी ग्रँट रोड येथील फरहात शेख ही महिला पॅराथायरॉइड एडेमोना आजाराने ग्रासली होती. ही शस्त्रक्रिया थायरॉइड ग्रंथीत फसलेल्या ट्युमरची होती. त्यामुळे जेजे रुग्णालयाला सॅजेस पुरस्काराने गौरविण्यात आले. जेजे रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाला सेजेसने सन्मानित करण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे. त्या महिलेची शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी इण्ट्रा आॅपरेटिव्ह पॉलीपेक्टॉमी पद्धतीने केली. आणखी एका ३४ वर्षीय पुरुषाला जीवनदान दिले होते. तर ५५ वर्षीय महिलेच्या पोटामधील गाठ वाढत थेट फुप्फुसापर्यंत गेल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होत होता.

सर गॅरी यांनी मला सांगितले की, क्रिकेट खेळणाऱ्याने प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असेच खेळले पाहिजे आणि साधेपणाने खेळले पाहिजे. आणि हेच तत्त्व ते क्रिकेटच्या मैदानाबाहेरही पाळतात असे दिसून आले.

Web Title: Honor of Ajay Bhandarwar of JJ Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर