हायकोर्ट न्यायाधीशाने केले पहाटे ३ पर्यंत कोर्टात काम! न्या. काथावाला यांची अथक कार्यशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:26 AM2018-05-06T06:26:22+5:302018-05-06T06:26:22+5:30

उन्हाळी सुट्टी सुरू होण्याआधीच्या शुक्रवार या शेवटच्या दिवशी, मुंबई उच्च न्यायालयातील इतर सर्व न्यायदालनांमध्ये सायंकाळी ५ वाजता नेहमीप्रमाणे सामसूम झाले, पण न्या. शाहरुख काथावाला हे एकटेच त्याला अपवाद होते. न्या. काथावाला यांनी शनिवारी पहाटे ३.३० पर्यंत न्यायालयात बसून न्यायनिवाडा केला आणि शिल्लक काम वेळीच उरकण्याचा नवा व न भूतो असा पायंडा घालून दिला.

 High Court judge did 3 working in the court! Justice Kathwala's tireless work style | हायकोर्ट न्यायाधीशाने केले पहाटे ३ पर्यंत कोर्टात काम! न्या. काथावाला यांची अथक कार्यशैली

हायकोर्ट न्यायाधीशाने केले पहाटे ३ पर्यंत कोर्टात काम! न्या. काथावाला यांची अथक कार्यशैली

Next

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरू होण्याआधीच्या शुक्रवार या शेवटच्या दिवशी, मुंबई उच्च न्यायालयातील इतर सर्व न्यायदालनांमध्ये सायंकाळी ५ वाजता नेहमीप्रमाणे सामसूम झाले, पण न्या. शाहरुख काथावाला हे एकटेच त्याला अपवाद होते. न्या. काथावाला यांनी शनिवारी पहाटे ३.३० पर्यंत न्यायालयात बसून न्यायनिवाडा केला आणि शिल्लक काम वेळीच उरकण्याचा नवा व न भूतो असा पायंडा घालून दिला.
काही न्यायाधीशांनी या आधी सा. ७ ते ७.३० पर्यंत कोर्टात काम केले आहे. इतर काही न्यायाधीश न्यायालयात नाही, तरी चेंबरमध्ये बसून शिल्लक राहिलेले काम होता होईतो उरकत असतात, परंतु न्या. काथावाला यांनी या सर्वाची परिसीमा गाठली. तुमची तयारी असेल, तर कितीही वेळ न्यायालय चालविण्यास मी तयार आहे, हे त्यांचे वकिलांना व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना नेहमीचे सांगणे असते. त्यानुसार, न्या. काथावाला यांनी दोन आठवड्यांपूर्वी मध्यरात्रीपर्यंत कोर्टात बसून काम केले होते.
सध्या न्या. काथावाला यांच्याकडे दिवाणी प्रकरणांमधील तातडीच्या आदेशांसाठी केलेल्या अर्जांचे काम आहे. शुक्रवारी त्यांच्या न्यायालयात अशी शंभरहून अधिक प्रकरणे बोर्डावर होती. सुट्टीआधीचा शेवटचा दिवस असल्याने, शक्य होईल तेवढी प्रकरणे हातावेगळी करायची व इतरांना सुट्टीनंतरची तारीख द्यायची, ही नेहमीची रूढ पद्धत, परंतु कामाचा प्रचंड उरक असलेल्या न्या. काथावाला यांनी, सुट्टीआधीच सर्व काम संपविण्याचे ठरविले आणि पहाटे ३.३० पर्यंत बसून ते पूर्ण केले.
मध्यरात्रीपर्यंत किंवा पहाटेपर्यंत कोर्ट चालविणे हे अपवादात्मक झाले, पण एरवीही न्या. काथावाला यांचे न्यायालय सकाळी ११ ऐवजी एक तास आधी म्हणजे सकाळी १० वाजता सुरू होते व सायंकाळी ५नंतरही ते सुरू राहणे हे नित्याचेच आहे.
प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी न्यायालये दोन पाळ्यांमध्ये रात्रीपर्यंत चालवावीत, अशी सूचना मध्यंतरी पुढे आली होती. न्या. काथावाला यांनी दररोज अनेक तास जास्त व प्रसंगी सलन १६-१७ तास काम करून, ही सूचना निदान आपल्यापुरती तरी अंमलात आणली आहे. ‘लॉर्डर्शिप’च न कंटाळता एवढे अथक काम करतात म्हटल्यावर,
त्यांचे न्यायालयीन कर्मचारीही तेवढ्यात उत्साहाने जास्त काम करतात.

लगेचच दिला निकाल
शनिवारी पहाटे माझ्या प्रकरणाची सर्वात शेवटी सुनावणी झाली. त्या आडवेळीही न्यायमूर्ती सकाळी न्यायालयात यावे, तसेच ताजेतवाने व प्रफुल्लित होते. त्यांनी शांतपणाने सविस्तर युक्तिवाद ऐकून घेऊन लगेच निकालही दिला.
- प्रवीण समधानी, ज्येष्ठ वकील.

Web Title:  High Court judge did 3 working in the court! Justice Kathwala's tireless work style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.