प्रसूतीनंतर राहून गेला मातेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:03 AM2018-06-12T04:03:55+5:302018-06-12T04:03:55+5:30

वसई येथील पालिका प्रसुतीगृहातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा राहून गेल्याची घटना समोर आली आहे.

health News | प्रसूतीनंतर राहून गेला मातेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा

प्रसूतीनंतर राहून गेला मातेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा

Next

वसई : येथील पालिका प्रसुतीगृहातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा राहून गेल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतर ४० दिवसांनी महिलेला वेदना झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे महापालिकेच्या डॉक्टरांचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
नालासोपारा पश्चिमेला रॉयल काऊंटी सोसायटीत राहणाऱ्या शमा शेख या दिव्यांग मातेच्या बाबत ही घटना घडली. तिचे पतीही दिव्यांग आहेत. शब्बीर यांनी पत्नी शमा यांना वसई-विरार महापालिकेच्या तुळींज येथील माता बाल संगोपन केंद्रात २५ एप्रिल २०१८ रोजी प्रसुतीसाठी दाखल केले. त्या प्रसूत झाल्यानंतर ३० एप्रिलला त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या ओटीपोटात कळा येऊ लागल्या. ६ जून ला त्या मुळव्याधीवर उपचार करण्यासाठी दंडवते हॉस्पिटल गेल्या होत्या. त्यावेळी तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यांनी सोनोग्राफी केली असता त्यांच्या ओटीपोटात कापसाचा बोळा असल्याचे निष्पन्न झाले.
झालेल्या प्रकारामुळे पालिकेच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शब्बीर शेख यांना पोलीस ठाण्यात अनेक फेºया देखील मारल्या . ते नालासोपारा पश्चिमेला राहत असल्याने त्यांनी तेथील पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यासाठी धाव घेतली. त्यांची फिर्याद ठाणे अंमलदाराने न घेता मोठ्या साहेबांची वाट पहा, असे सांगून त्यांना ताटकळत ठेवले. त्यानंतर आलेल्या वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांची तक्र ार घेण्यास नकार दिला व त्यांना नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. या सर्व गोष्टींमुळे शेख यांना मानसिक त्रास देखील सहन करावा लागला. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात शेख यांची तक्र ार अखेर नोंदविली. मात्र त्यावर अद्याप देखील कोणती कारवाई करण्यात आलेली नाही .
४० दिवसांनी शमा शेख आमच्याकडे आल्या आम्ही त्यांच्यावर उपचार केले. त्यात आमची काहीही चूक नसून तो गोळा कसा त्यांच्या पोटात राहिला हे आम्हांला ठाऊक नाही. असा खुलासा पालिकेच्या डॉक्टर गायत्री गोरख यांनी केला आहे, तर संबंधित डॉक्टरवर कोणती कारवाई होणार हे ही सांगण्यास त्यांनी नकार दिला.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गायनॉकॉलॉजिस्टकडून अशा चुका गेल्या काही वर्षांपासून घडत नाहीत. कापूस हा लगेच विघटीत होत नाही तो कितेक वर्षे रुग्णाच्या पोटात राहू शकतो. जगभरात अनेक डॉक्टरांद्वारे अशा चुका झाल्याच्या अनेक घटना आहेत.
असा चुका या एक्सरे किंवा सोनोग्राफीद्वारेच शोधल्या जाऊ शकतात. अशा घटनांमध्ये रु ग्णांना फार पिडा होते आणि असा प्रकार कधीकधी जीवावर देखील बेतू शकतो.

Web Title: health News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.