2000 मीटर लांब वायरपासून साकारला भव्य-दिव्य गणपती बाप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 08:23 PM2018-09-20T20:23:19+5:302018-09-26T20:38:29+5:30

गणपती बाप्पा सुखकर्ता, दुःखहर्ता आहे, तो भक्तांचं संकटापासून रक्षण करतो. रक्षण-संरक्षण हेच हॅवेल्सचंही उद्दिष्ट असल्यानं विघ्नहर्त्याचा हा सण आगळ्या पद्धतीने साजरा करायचं कंपनीनं ठरवलं आणि लालबागच्या राजाच्या मंडपात अवतरले ८ फूट  १० इंच उंचीचे गणराय.

Havells has made ganpati idol out of wires at lalbaugcha raja pandal | 2000 मीटर लांब वायरपासून साकारला भव्य-दिव्य गणपती बाप्पा!

2000 मीटर लांब वायरपासून साकारला भव्य-दिव्य गणपती बाप्पा!

Next

भारतीय संस्कृतीत सण-उत्सव म्हणजे आनंददायी सोहळा. कुटुंबाला, मित्रमंडळींना एकत्र आणण्याचं काम हे सण करत असतात. माणसांचं एकत्र येणं म्हणजे मनांचं एकत्र येणं, विचारांचं एकत्र येणं. या एकोप्यातूनच बनत जातो समाज, जुळत जातात समाजबंध. या समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशानंच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. त्यातून जाती-धर्मांमधील भेद मिटले आणि स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली. स्वाभाविकच, या उत्सवाला वेगळंच महत्त्व आहे. म्हणूनच, गेली सव्वाशे वर्षं हा उत्सव अविरतपणे भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा होतोय. लाखो भक्तांच्या लाडक्या गणरायाचा हा उत्सव हॅवेल्स कंपनीनं अधिक 'तेजोमय' करण्याचा मनोभावे प्रयत्न केला आणि भाविकांना तो भावलाही.  

कुठलाही सण-उत्सव म्हटला की रोषणाई आलीच आणि रोषणाई म्हटली की हॅवेल्स वायर्स. आगीपासून रक्षण करणाऱ्या, सुपर सेफ वायर्स म्हणून हॅवेल्स वायर्सनी नावलौकिक कमावला आहे. गणपती बाप्पा सुखकर्ता, दुःखहर्ता आहे, तो भक्तांचं संकटापासून रक्षण करतो. रक्षण-संरक्षण हेच हॅवेल्सचंही उद्दिष्ट असल्यानं विघ्नहर्त्याचा हा सण आगळ्या पद्धतीने साजरा करायचं कंपनीनं ठरवलं आणि लालबागच्या राजाच्या मंडपात अवतरले ८ फूट  १० इंच उंचीचे गणराय #HavellsKeDeva. लालबागच्या राजाच्या दर्शनाआधी या देवाचं दर्शन भाविकांना घडतंय. 

या गणरायांचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल २१६० मीटर लांब वायर वापरून ही मूर्ती साकारण्यात आलीय. पिवळ्या रंगाची १२ बंडल्स वायर, लाल आणि निळ्या रंगाची प्रत्येक ३ बंडल्स, पाच बंडल्स पांढरी आणि १ बंडल हिरव्या रंगाची वायर या मूर्तीसाठी वापरण्यात आलीय. हा बाप्पा कमळावर विराजमान झाला असून मूर्तीचं वजन १७५ किलो आहे. ही मूर्ती लिफ्टप्रमाणे वर-खालीही होते. त्यामुळे बच्चेकंपनीला फारच कुतूहल वाटतं. 

अज्ञानाच्या अंधारातून बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा सगळ्यांना प्रकाशाच्या वाटेवर  घेऊन जातो. तो सकारात्मक ऊर्जा देतो, बळ देतो. तसंच, जनमानसाचं आयुष्य प्रकाशमान आणि सुरक्षित करण्याचं ध्येय बाळगून हॅवेल्स वायर कार्यरत आहे आणि तोच संदेश #HavellsKeDeva च्या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे.  

Web Title: Havells has made ganpati idol out of wires at lalbaugcha raja pandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.