नायगावच्या विघ्नहर्त्याचा अनाथ मुलांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 02:21 AM2018-09-22T02:21:30+5:302018-09-22T02:21:53+5:30

राजारामवाडी व संलग्न परिसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नायगावचा विघ्नहर्ता गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी राखून बाप्पाची सेवा करीत आहे.

The hand of the orphan children in the hand of Nayagaon | नायगावच्या विघ्नहर्त्याचा अनाथ मुलांना मदतीचा हात

नायगावच्या विघ्नहर्त्याचा अनाथ मुलांना मदतीचा हात

Next

मुंबई : राजारामवाडी व संलग्न परिसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नायगावचा विघ्नहर्ता गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी राखून बाप्पाची सेवा करीत आहे. यंदा मंडळाचे ४७ वे वर्ष असून, नायगावच्या विघ्नहर्त्याने १० अनाथ मुलांचा खर्च, पाच अंध मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि दोन कर्करोगाने त्रासलेल्या रुग्णांना आर्थिक मदत केली आहे. त्याचप्रमाणे, यंदाच्या वर्षी श्रींची मूर्ती वाडीतील पोलीस बांधवांनी दिली आहे. नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या पोलीस बांधवांना ‘श्री’च्या आरतीचा मानही देण्यात आला.
या गणेशोत्सव मंडळाने १९६२ पासून गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर, १९७३ साली चाळीत बसणारा गणपती वंदे मातरम् क्रीडांगणाच्या पटांगणात बसविण्यास सुरुवात केली. दरवर्षी उत्सव काळात महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. परिसरातील सर्व महिलांचा मंगळागौरचा कार्यक्रम घेतला जातो. त्या दिवशी आरतीचा मानदेखील महिलांचा असतो. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, करिअर मार्गदर्शन, तर वयोवृद्धांसह सर्वांसाठीही योगा प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. याशिवाय, सध्या प्लॅस्टिकबंदीवर मंडळाने पथनाट्यांचेही सादर केले़
बाप्पाच्या दरबारी रंगली ‘माझा मोदक’ स्पर्धा
या बाप्पाच्या दरबारातही ‘लोकमत सखी मंच’ आणि ‘माझा’च्या वतीने माझा मोदक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत तृप्ती मोहिते यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर द्वितीय स्थान आशा चाळके आणि तृतीय क्रमांक भारती जाधव यांनी मिळवला. उत्तेजनार्थ स्थानी जान्हवी तडावळे आणि दीपाली गुंडकर यांना दिले.

Web Title: The hand of the orphan children in the hand of Nayagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.