ग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 05:55 AM2018-05-27T05:55:18+5:302018-05-27T05:55:18+5:30

दहावीच्या परीक्षा झाल्या की, अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होते. मुंबईतील नामांकित कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी मुंबईसह राज्याबाहेरील अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. अशा वेळी राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या पद्धतीप्रमाणे आपल्या ग्रेडचे गुणांत रूपांतर करून घेणे आवश्यक असते.

Guidance Centers to grade conversion properties | ग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे  

ग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे  

Next

मुंबई - दहावीच्या परीक्षा झाल्या की, अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होते. मुंबईतील नामांकित कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी मुंबईसह राज्याबाहेरील अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. अशा वेळी राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या पद्धतीप्रमाणे आपल्या ग्रेडचे गुणांत रूपांतर
करून घेणे आवश्यक असते.
मात्र, पुरेशी माहिती नसल्याने विद्यार्थ्यांची ऐन प्रवेश प्रक्रियेवेळी तारांबळ उडते आणि उपसंचालक कार्यालयाबाहेर माहितीसाठी पालक फेऱ्या मारताना दिसून येतात. यासाठी शिक्षण मंडळाकडून मार्गदर्शन केंद्रे उपलब्ध करून दिल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे, तसेच मार्गदर्शन केंद्रांची माहिती अकरावी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेत दिलेली आहे.
सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट एव्हरेज (सीजीपीए) पद्धतीने दिले जातात. त्यानुसार, विद्यार्थ्यांना गुणांऐवजी श्रेणी दिली जाते. त्यामुळे अन्य राज्यांतून मुंबईत प्रवेशासाठी येणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांद्वारे बोर्डाकडून गुण रूपांतरित करून घ्यावे लागतात. हे गुण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जामध्ये नमूद करावे लागतात. प्रवेश अर्जाचा भाग-१ भरल्यानंतर तो मंजूर कसा करून घ्यावा, याबाबत माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

येथे करून घ्या ग्रेडचे गुणांत रूपांतर

च्राजहंस विद्यालय, अंधेरी (प.).
च्आर. एन. पोदार स्कूल, सांताक्रुझ (प.).
च्एपीजे स्कूल, सेक्टर-१५, नेरूळ, नवी मुंबई.
च्डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, प्लॉट नं. ११, सेक्टर १०, ऐरोली, नवी मुंबई.
च्लोकपुरम पब्लिक स्कूल,
ठाणे (प.).

Web Title: Guidance Centers to grade conversion properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.