‘महाराष्ट्र बंद’ बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न , प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:52 AM2018-01-20T04:52:07+5:302018-01-20T04:52:31+5:30

कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचे राज्यभर पडसाद उमटले. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदमध्ये युवा, विद्यार्थी वर्ग स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरला.

The government's attempt to defame 'Maharashtra Bandh', allegations of Prakash Ambedkar | ‘महाराष्ट्र बंद’ बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न , प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

‘महाराष्ट्र बंद’ बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न , प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

googlenewsNext

मुंबई : कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचे राज्यभर पडसाद उमटले. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदमध्ये युवा, विद्यार्थी वर्ग स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरला. मात्र, या बंदमागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचे भासवून सरकार महाराष्ट्र बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केला.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विद्यार्थ्यांना नक्षली ठरविले जात आहे. काही विद्यार्थ्यांना लोकशाही हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे असे वाटत नाही. काही जण कविता, लेखांतून व्यक्त होतात. त्यांना समजून घ्यायला हवे. मात्र, अशी भूमिका मांडणाºयांना सरकार नक्षली ठरवत आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराला उत्तर म्हणून बंद पुकारला होता. बंदमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना आवाज मिळाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
सध्याची देशाची राजकीय परिस्थिती पाहता २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस भाजपाला पर्याय ठरू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची स्वच्छ प्रतिमा जपण्यात यशस्वी झाले आहेत. राहुल गांधी यांचे नेतृत्व चांगले असले तरी त्यांचा करिश्मा चालेल असे नाही. २०२४च्या निवडणुकीतच काँग्रेस हा सक्षम पर्याय ठरू शकेल, असेही आंबेडकर म्हणाले.

Web Title: The government's attempt to defame 'Maharashtra Bandh', allegations of Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.