राजर्षी शाहू स्मारक बांधण्यास शासन कटिबद्ध - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:00 AM2018-01-29T06:00:33+5:302018-01-29T06:00:55+5:30

सध्या माणसांकडे ब-यापैकी आर्थिक सुबत्ता आहे. या आर्थिक सुबत्तेला सांस्कृतिक उपक्रमांचीही जोड मिळायला हवी. संस्कारांची रुजवण करण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे मुंबईत कोल्हापूर भवन आणि राजर्षी शाहू स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Government committed to build Rajarshi Shahu memorial - Chandrakant Patil | राजर्षी शाहू स्मारक बांधण्यास शासन कटिबद्ध - चंद्रकांत पाटील

राजर्षी शाहू स्मारक बांधण्यास शासन कटिबद्ध - चंद्रकांत पाटील

Next

मुंबई : सध्या माणसांकडे ब-यापैकी आर्थिक सुबत्ता आहे. या आर्थिक सुबत्तेला सांस्कृतिक उपक्रमांचीही जोड मिळायला हवी. संस्कारांची रुजवण करण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे मुंबईत कोल्हापूर भवन आणि राजर्षी शाहू स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र घडविण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजर्षी शाहू कोल्हापूर विकास प्रतिष्ठान व शाहूवाडी तालुका महासंघाच्या वतीने विनय कोरे यांचा सत्कार, प्रतिष्ठानचे संचालक ज्ञानदेव पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त ‘देवसंज्ञा’ हा काव्यसंग्रह, ‘कानोसा’ हे पुस्तक आणि कोल्हापूर विशेषांकाचा प्रकाशन सोहळा अलीकडेच चिंचपोकळी येथील श्रमिक जिमखान्यात आयोजित करण्यात आला होता. या वेळी पाटील यांनी मुंबईत कोल्हापूर भवन उभारण्याचे आश्वासन दिले.
तत्पूर्वी बोलताना विनय कोरे यांनी कोल्हापूर भवन उभारण्याची मागणी केली होती. दरम्यान, ‘कानोसा’ या पुस्तकातून कानसा-खोरे आणि शाहूवाडी तालुक्यातील सामाजिक, राजकीय यांचे प्रखर वास्तवाचा एक दस्तऐवज मांडण्यात आला आहे, तसेच ज्ञानदेव पाटील यांनी लिहिलेल्या ‘देवसंज्ञा’ या काव्यसंग्रहाचा, ‘कानोसा’ या पुस्तकाचा आणि कोल्हापूर विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Government committed to build Rajarshi Shahu memorial - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.