माल वाहतूकदारांचा संप ‘जैसे थे’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 06:52 AM2018-07-23T06:52:21+5:302018-07-23T06:53:00+5:30

सरकारने मागण्या मान्य न केल्यास संप कायम राखण्यात येईल, अशी भूमिका आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या (एआयएमटीसी) वतीने घेण्यात आली आहे.

Goods like transporters were like! | माल वाहतूकदारांचा संप ‘जैसे थे’च!

माल वाहतूकदारांचा संप ‘जैसे थे’च!

Next

मुंबई : मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग तिसऱ्या दिवशीदेखील सुरू आहे. राज्यासह जिल्हा आणि ग्रामीण स्तरातून सर्वाधिक प्रतिसाद लाभत आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास संप कायम राखण्यात येईल, अशी भूमिका आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या (एआयएमटीसी) वतीने घेण्यात आली आहे.
डिझेलचा समावेश जीएसटी अंतर्गत करून त्यावरील किमतीवर नियंत्रण हवे, देशभरातील डिझेल किमतीमध्ये समानता हवी, टोल यंत्रणेत पारदर्शकता हवी, या मागण्यांसाठी वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. संपात देशभरातील ९३ लाख माल वाहतूकदारांचा सहभाग असल्याने तीन दिवसांत सुमारे १२ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती एआयएमटीसीने दिली.
वाहतूकदारांबाबत सरकारचे धोरण उदासीन आहे. यामुळे याचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणाºया वाहतूकदारांचा यात सहभाग नाही, मात्र सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार तेदेखील संपात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील काही कंपन्यांच्या सोबत सकारात्मक चर्चेमुळे संपात त्यांनीदेखील सहभाग नोंदवला आहे.

व्यवहार ठप्प
औद्योगिक कारखान्यांसह विविध उद्योगांमधील सर्व व्यवहार संपामुळे बंद झाले आहेत. माल वाहतूकदारांबरोबर खासगी बस, टॅक्सीही आहे. तसेच संपाला स्कूल बस संघटनांनीही पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान, राज्याच्या विविध महामार्गांवर वाहने रस्त्यावर उभी असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर विविध गोदींमध्येदेखील व्यवहार ठप्प आहेत. तिसºया दिवशीदेखील सरकारकडून अद्याप कोणीही चर्चेसाठी न आल्याने संप कायम ठेवण्यात येणार असल्याचे एआयएमटीसीने स्पष्ट केले.

Web Title: Goods like transporters were like!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.