Good news! 12 special local trains on the central and western railway lines on the 31st of December | खूशखबर! मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर 31 डिसेंबरच्या रात्री 12 विशेष लोकल

मुंबई- नविन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी 31 डिसेंबरला घराबाहेर पडणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाने खास गिफ्ट दिलं आहे. रेल्वे प्रशासनाने मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर 12 विशेष लोकल सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.  पश्चिम रेल्वे मार्गावरून 8 आणि मध्य रेल्वे मार्गावरून 4 अशा विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील विशेष लोकल
सीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल तर कल्याण-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड वाजता व  मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील विशेष लोकल
पश्चिम रेल्वेची विशेष (लोकल 1) चर्चगेट-विरार ही लोकल चर्चगेटहून रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी निघेल. रात्री 2 वाजून 55 मिनिटांनी विरार येथे पोहोचेल. 
विशेष लोकल (लोकल २) विरार-चर्चगेट विरार येथून 12 वाजून 15 मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला 1 वाजून 47 मिनिटांनी पोहोचणार आहे. 
विशेष लोकल (लोकल ३) चर्चगेट येथून रात्री २ वाजता निघणार असून, विरारला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे.
 विशेष लोकल (लोकल ४) विरार येथून रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री २ वाजून १७ मिनिटांनी पोहोचेल. 
विशेष लोकल (लोकल ५) चर्चगेट येथून रात्री २ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी विरार येथे पोहोचेल. 
विशेष लोकल (लोकल ६) विरार येथून १ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री ३ वाजून १२ मिनिटांनी पोहोचेल.
 विशेष लोकल (लोकल ७) चर्चगेटवरून रात्री ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून, विरारला पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. 
विशेष लोकल (लोकल ८) विरार येथून रात्री ३ वाजून ५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला पहाटे ४.३७ मिनिटांनी पोहोचणार आहे.

हार्बर रेल्वे मार्गावरील विशेष लोकल
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-पनवेल (डाउन) मध्यरात्री दीड व  मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल सोडली जाईल. पनवेल-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी. 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विशेष लोकल सोडल्या जातील. 31 डिसेंबरच्या रात्री बाहेर सेलिब्रेशन करायला गेलेली लोक सार्वजनिक वाहतुकीच्या कमरतेमुळे कुठेही अडकू नये, यासाठी सुविधा दिल्या जातील, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी सांगितलं. 
 


Web Title: Good news! 12 special local trains on the central and western railway lines on the 31st of December
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.