‘त्या’ वसतिगृहात मुलींना अद्याप प्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 06:04 AM2018-12-15T06:04:38+5:302018-12-15T06:05:10+5:30

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या निवासासाठी विद्यापीठाची दोन वसतिगृहे अपुरी पडत असल्याने मंत्रालयाशेजारी मादाम कामा वसतिगृह उभारले.

Girls do not even have access to the 'Hostel' in the hostel | ‘त्या’ वसतिगृहात मुलींना अद्याप प्रवेश नाही

‘त्या’ वसतिगृहात मुलींना अद्याप प्रवेश नाही

googlenewsNext

- सीमा महांगडे 

मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या निवासासाठी विद्यापीठाची दोन वसतिगृहे अपुरी पडत असल्याने मंत्रालयाशेजारी मादाम कामा वसतिगृह उभारले. या वसतिगृहाचे उद्घाटन होऊन वर्ष सरले तरी वसतिगृह विद्यार्थिनींसाठी खुले केलेले नाही. सध्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठात राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय येथे केली आहे. ज्या विद्यार्थिनींसाठी हे वसतिगृह उभारले आहे त्यांच्यासाठी इथे सोय नसताना या विद्यार्थ्यांची सोय येथे कशी होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वर्षभरापूर्वी उद्घाटन होऊनही अद्याप वसतिगृहामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. तसेच सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. उपाहारगृहासाठी कंत्राटदारही नियुक्त नाही, त्यामुळे वसतिगृह खुले केले नसल्याची माहिती मिळाली. असे असूनही मुलांच्या राहण्याची केली आहे. यासंदर्भात विद्यापीठाचे रजिस्टार सुनील भिरूड यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.

स्पर्धेसाठी मुलांची सोय
मुंबई विद्यापीठात सध्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी आले आहेत. यात ६४ संघांचा समावेश आहे. मादाम कामा वसतिगृहासह आणखी एक-दोन ठिकाणी या राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली आहे.

Web Title: Girls do not even have access to the 'Hostel' in the hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.