मुंबई : टेम्पोची चार शाळकरी मुलांना धडक, एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 12:31 PM2017-11-07T12:31:56+5:302017-11-07T12:50:25+5:30

टेम्पोनं चार विद्यार्थ्यांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून तीन जणांना किरकोळ जखम झाली आहे. मालवणीमध्ये मंगळवारी (7 नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

Girl died in road accident | मुंबई : टेम्पोची चार शाळकरी मुलांना धडक, एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

मुंबई : टेम्पोची चार शाळकरी मुलांना धडक, एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Next

मुंबई - भरधाव टेम्पोनं चार विद्यार्थ्यांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून तीन जणांना किरकोळ जखम झाली आहे. मालवणीमध्ये मंगळवारी (7 नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मार्वे रोडवरील जरीमरी मंदिराजवळ 'टी जंक्शन'कडे जाणा-या मार्गावर हा अपघात घडला आहे. MH04HQ0702  असा धडक देणा-या टेम्पोचा क्रमांक होता.

मुस्कान मेमन (वय 13 वर्ष) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर नेहा मेनाली ( वय 13 वर्ष), भुपेंद्र मेनाली ( वय 9 वर्ष) आणि कमल मेनाली ( वय 12 वर्ष) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे सर्व विद्यार्थी मालवणीतील शाळेतच शिकत असून तेथीलच रहिवासी आहेत. दरम्यान, अपघातानंतर टेम्पो चालकानं टेम्पो तेथेच सोडून घटनास्थळाहून पसार झाला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून  फरार टेम्पो चालकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


 

Web Title: Girl died in road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.