सत्ताधा-यांच्या योजनेसाठी पालिकेला भुर्दंड; पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:56 AM2017-11-19T04:56:39+5:302017-11-19T04:56:48+5:30

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने सर्व योजना गुंडाळण्यास सुरुवात केली असताना, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याची योजना शिवसेनेने जाहीर केली. मात्र, हा आर्थिक भार बेस्ट पेलू शकत नसल्याने, महापालिका १६५ कोटी रुपये या योजनेसाठी मोजणार आहे.

Fund for municipal corporation; Free bus pass for students of municipality school | सत्ताधा-यांच्या योजनेसाठी पालिकेला भुर्दंड; पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास

सत्ताधा-यांच्या योजनेसाठी पालिकेला भुर्दंड; पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास

Next

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने सर्व योजना गुंडाळण्यास सुरुवात केली असताना, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याची योजना शिवसेनेने जाहीर केली. मात्र, हा आर्थिक भार बेस्ट पेलू शकत नसल्याने, महापालिका १६५ कोटी रुपये या योजनेसाठी मोजणार आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारी बहुतांशी मुले गरीब कुटुंबातील असतात. त्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांचा बसप्रवास मोफत करण्याची घोषणा शिवसेनेने आपल्या वचननाम्यातून केली
होती. मात्र, बेस्ट आर्थिक संकटात असल्याने, मोफत बसपासचा भार
बेस्ट उपक्रमाला परवडणारा
नव्हता. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने
ही आपली महत्त्वाकांक्षी योजना पालिका प्रशासनाच्या गळी उतरविली आहे.
या मोफत बसपासचा फायदा पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाºया तीन लाख ३१ हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या योजनेंतर्र्गत घराजवळील बसथांब्यापासून ते शाळेपर्यंतच्या बसथांब्यापर्यंत मोफत बस प्रवास विद्यार्थ्यांना करता येणार आहे. या योजनेसाठी पालिकेच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षात १६४ कोटी ७७ लाख रुपये भार पडणार आहे.

पालिका शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या ३ लाख ३१ हजार ७५५ विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवासाचा लाभ मिळणार आहे.

या योजनेसाठी पालिकेच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षात १६४ कोटी ७७ लाख ९६ हजार ८०० रुपये भार पडणार आहे.

प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी १३४ कोटी ७७ लाख रुपये, तर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बसपासवर ३० कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव, बेस्ट आणि महापालिकेच्या लेखा विभागाने तयार केला आहे.

Web Title: Fund for municipal corporation; Free bus pass for students of municipality school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट