four dead in road accident near vikhroli parksite | विक्रोळी पार्कसाईटमध्ये भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
विक्रोळी पार्कसाईटमध्ये भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

ठळक मुद्दे विक्रोळी पार्कसाईट येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.धान्याचा ट्रक उलटून चार जण चिरडले गेले.

मुंबई - विक्रोळी पार्कसाईट येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धान्याचा ट्रक उलटून चार जण चिरडले गेले. ट्रकचं मागील चाक गटारात अडकल्याने ट्रक उलटल्याची माहिती मिळत आहे. 

विक्रोळी पार्कसाईटमध्ये धान्याने भरलेला ट्रक जात असताना ट्रकचे मागील चाक हे गटारात अडकले. चाक गटारात अडकल्याने ट्रक पलटी झाला. त्याचवेळी त्या ठिकाणी पाच जण उभे होते. ट्रक पलटी झाल्याने हे पाचही जण ट्रक खाली चिरडले आणि त्यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक उचलण्यात आला. मात्र तो पर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.  


Web Title: four dead in road accident near vikhroli parksite
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.