‘उडान’मुळे हवाई वाहतुकीला ‘सुवर्णकाळ’, प्रवाशांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 05:36 AM2018-01-03T05:36:50+5:302018-01-03T05:37:12+5:30

हवाई सफरीचे स्वप्न सध्या वास्तवात उतरत आहे. उडान योजनेमुळे देशांतर्गत हवाई वाहतुकीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर २०१६च्या तुलनेत नोव्हेंबर २०१७ या महिन्यात हवाई प्रवाशांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती हवाई वाहतूक संचालनालयाने प्रसिद्ध केली आहे.

 'Flying' means 'golden period' for air traffic, 17% increase in passenger traffic | ‘उडान’मुळे हवाई वाहतुकीला ‘सुवर्णकाळ’, प्रवाशांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ

‘उडान’मुळे हवाई वाहतुकीला ‘सुवर्णकाळ’, प्रवाशांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ

Next

मुंबई  - हवाई सफरीचे स्वप्न सध्या वास्तवात उतरत आहे. उडान योजनेमुळे देशांतर्गत हवाई वाहतुकीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर २०१६च्या तुलनेत नोव्हेंबर २०१७ या महिन्यात हवाई प्रवाशांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती हवाई वाहतूक संचालनालयाने प्रसिद्ध केली आहे. उडान योजनेंतर्गत एका तासाच्या हवाई प्रवासासाठी २५०० रुपये दरामुळे सध्याचा काळ हवाई वाहतुकीला सुवर्णकाळ असल्याचे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान (उडे देश का आम नागरिक) योजना सुरू करून कोट्यवधी नागरिकांचे विमान प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरवले. उपक्रमाला देशभरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. उडानच्या पहिल्या टप्प्यात पाच विमान कंपन्यांना मार्च २०१८पर्यंत १२४ हवाई मार्गांवर प्रवासी सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. देशांतर्गत हवाई प्रवाशांनी जानेवारी-नोव्हेंबर २०१७ या ११ महिन्यांत एक कोटीचा आकडा पार केला. जानेवारी- नोव्हेंबर २०१६मध्ये प्रवासी संख्या ९ कोटी होती. २०१७च्या ११ महिन्यांत हाच आकडा १०.६ कोटींच्या घरात पोहोचला आहे. सद्य:स्थितीत देशातील विमानतळांची प्रवासी क्षमता २८.२ कोटी इतकी आहे. २०२० सालापर्यंत ही क्षमता ३९.६ कोटीपर्यंत नेण्याचे आव्हान आहे, अशी माहिती हवाई वाहतूक संचालनालयाने दिली.
सध्याचा देशातील हवाई
प्रवासी वाहतुकीचा आलेख उंचावत आहे. परिणामी, २०३६ सालापर्यंत देशातील हवाई प्रवाशांचा आकडा ४८ कोटींच्या घरात जाईल. ही
प्रवासी संख्या जपान आणि
जर्मनीच्या एकत्रित संख्येपेक्षा
जास्त असेल. जपानमध्ये २२.५ कोटी आणि जर्मनीमध्ये २० कोटी हवाई प्रवासी संख्या आहे. जगात हवाई प्रवाशांमध्ये तिसºया क्रमांकावर असलेल्या युनायटेड किंगडमला (यूके) भारत २०२५ सालापर्यंत
मागे टाकेल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (आयटा) अहवालात प्रसिद्ध करण्यात आली.

देशांतर्गत प्रवासी
संख्या (प्रवासी)
जानेवारी-नोव्हेंबर
२०१६ : ९ कोटी
२०१७ : १०.६ कोटी
भारतीय विमानतळांची प्रवासी क्षमता
२८.२ कोटी (प्रतिवर्ष)
२०२०पर्यंत अंदाजे प्रवासी क्षमता
३९.६ कोटी
२०१४मध्ये देशातील विमानांची संख्या
३९५
२०१७मध्ये देशातील विमानांची संख्या
५४८

भविष्यातील ‘उडान’चा विस्तार
विमान कंपनी सध्या विमाने नव्याने दाखल होणारी विमाने
एअर इंडिया १५८ १९ (मार्च २०१९ पर्यंत)
इंडिगो १४७ ४४८ (२०२४-२५ सालापर्यंत)
जेट एअरवेज ११४ ८६ (२०२४ सालापर्यंत)
स्पाइसजेट ५७ १५७ (२०२३ सालापर्यंत)

Web Title:  'Flying' means 'golden period' for air traffic, 17% increase in passenger traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.