मुंबईत आली पहिली आधुनिक ‘टेस्ला एक्स’ कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 04:59 AM2017-12-10T04:59:07+5:302017-12-10T04:59:20+5:30

कारप्रेमींच्या औत्सुक्याचा विषय असलेली ‘टेस्ला कार’ मुंबईतील एका कारप्रेमीने खरेदी केली आहे. मुंबई बंदरावर गुरुवारी दाखल झालेल्या या सात आसनी आलिशान कारची किंमत ५५ लाखांच्या घरात आहे.

 The first modern 'Tesla X' car came to Mumbai! | मुंबईत आली पहिली आधुनिक ‘टेस्ला एक्स’ कार!

मुंबईत आली पहिली आधुनिक ‘टेस्ला एक्स’ कार!

Next

मुंबई : कारप्रेमींच्या औत्सुक्याचा विषय असलेली ‘टेस्ला कार’ मुंबईतील एका कारप्रेमीने खरेदी केली आहे. मुंबई बंदरावर गुरुवारी दाखल झालेल्या या सात आसनी आलिशान कारची किंमत ५५ लाखांच्या घरात आहे. गरुडाच्या पंखांसारखे वरती उघडणारे दरवाजे हे वैशिष्ट्य असणा-या या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
टेस्लाचा फोटो आॅनलाइन झळकताच, जगभरातील कारप्रेमींना तिने मोहिनी घातली. खरे तर ही जगप्रसिद्ध कार भारतातील रस्त्यांवर २०१९ मध्ये धावताना दिसणार आहे, परंतु कारच्या वेडापायी एका मुंबईकराने ती खरेदी केली आहे. भारतातील ही पहिलीच टेस्ला कार आहे.
‘आॅटोमोबिली अर्डेट : पेट्रोहेड लाइफ स्टाईल’ या फेसबुक पेजवर या टेस्लाचे फोटो पहिल्यांदा झळकले. अमेरिकन आॅटोमेकर कंपनीने या आलिशान एसयूव्हीच्या पूर्ण फोटोंची मालिकाच जारी केली. गरुडाच्या पंखांप्रमाणे या कारची दारे उघडली की वरती जातात आणि तिचा दिमाख डोळ्यात भरतो. जणू गरुडाप्रमाणे ती आता झेपावणार असेच पाहणाºया कोणालाही वाटते.
मुंबईकर कारप्रेमीने खरेदी केलेल्या या कारचे स्टिअरिंग उजव्या बाजूला आहे. मॉडेल एक्स सर्वात सुरक्षित, जलद आणि सर्वात सक्षम एसयूव्ही मानले जाते. दोन इलेक्ट्रिक मोटर्सने चारही चाकांना शक्तिशाली गती मिळते. त्यामुळेच ताशी २१० किमी. वेगाने ही कार धावू शकते. ६.२ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग पकडू शकते. १०० डी मॉडेल त्यापेक्षाही शक्तिशाली असून, ते ३.२ सेंकदात हा वेग पकडू शकते.

वाय-फाय कनेक्टिव्हिटीची गरज...
या कारची कार्यप्रणाली चालविण्यासाठी वाय-फाय मोबाइल कनेक्टिव्हिटी आवश्यक ठरते. २०१२ साली जिनेव्हा मोटार शोमध्ये या कारची संकल्पना समोर आणली गेली होती. मॉडेल एसप्रमाणे या कारमध्ये अनेक फीचर्स दिसून येतात.

Web Title:  The first modern 'Tesla X' car came to Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.