Fire at the shop in the building at Ballard Pier | बॅलार्ड पियर येथे इमारतीतील दुकानाला आग 
बॅलार्ड पियर येथे इमारतीतील दुकानाला आग 

मुंबई – मुंबईतील बॅलार्ड पियर भागात गोवा स्ट्रीटवरील संत निवास या इमारतीतील शॉप क्रमांक ३ ला आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ३ फायर इंजिन आणि १ पाण्याचा टँकर पोहचला असून आग आटोक्यात आली आहे. शेर-ए-पंजाबच्या बाजूला असलेल्या या चार माळ्याच्या इमारतीच्या तळमजल्याला असलेल्या दुकानाला आग लागल्याची माहिती फोर्ट फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी दिली. सध्या आग विजली असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.  


Web Title: Fire at the shop in the building at Ballard Pier
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.