क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेली आग आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 02:20 PM2019-04-22T14:20:50+5:302019-04-22T14:21:32+5:30

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून  ही आग आटोक्यात आणली. 

Fire in the Crawford Market is now in control | क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेली आग आटोक्यात

क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेली आग आटोक्यात

Next
ठळक मुद्देअब्दुल रेहमान स्ट्रीटवरील क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग मॉलला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. शॉपिंग मॉलमधील सामानाचे नुकसान झाले आहे. 

मुंबई - क्रॉफर्ड मार्केटमध्ये जीवदानी शॉपिंग सेंटरला लागलेली आग आटोक्यात आली आहे. अब्दुल रहमान स्ट्रीटवर असलेल्या या शॉपिंग मॉलला आज सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून  ही आग आटोक्यात आणली. 

अब्दुल रेहमान स्ट्रीटवरील क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग मॉलला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. तासाभराच्या ही आग आटोक्यात आली. आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र, शॉपिंग मॉलमधील सामानाचे नुकसान झाले आहे. 



Web Title: Fire in the Crawford Market is now in control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.