Fire Caught in Mumbai's Tardeo RTO Canteen | ताडदेव आरटीओला पुन्हा आग
ताडदेव आरटीओला पुन्हा आग

मुंबई : आरटीओ कँटीन मधील शेगडीचा भडका उडाल्याने आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली.

आरटीओ अधिकारी आणि कँटीन मधील कर्मचारी कार्यालयात बसविलेल्या अग्निशमन यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत.
कँटीन सुरू असताना एका शेगडीचा भडका उडाल्यामुळे कँटीनमधील वस्तुंनी पेट घेतला. १२ अग्निशमन यंत्रांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असून सद्यस्थितीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. गॅस लिकेजमुळे आग लागली असल्याचे कँटीनमधील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

आगीच्या घटनांचा इतिहास
ताडदेव आरटीओला यापुर्वीही तीन वेळा आगी लागल्या होत्या. 2015 मध्ये दोनदा तर गेल्या रविवारी मोठी आग लागली होती. 

English summary :
Taddeo RTO had already been burned three times in the past. Twice in 2015, there was a big fire last Sunday.


Web Title: Fire Caught in Mumbai's Tardeo RTO Canteen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.