फड गप्पांचा...‘मतदार यादीत नाव आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 02:51 AM2019-03-25T02:51:08+5:302019-03-25T02:51:16+5:30

काय सांगू रे...मी नव्हतो इथे गेले काही दिवस, आॅफिसच्या कामानिमित्त पायाला चाकं लागल्यासारखा फिरतोय देशभर. परवा निवडणुका जाहीर झाल्या...तेव्हा म्हटलं की आपली नावं आहेत ना यादीत तपासून पाहूया.

False chat ... 'Is there a name in the voters' list? | फड गप्पांचा...‘मतदार यादीत नाव आहे का?

फड गप्पांचा...‘मतदार यादीत नाव आहे का?

googlenewsNext

हजारवेळा सांगितलं की मतदारयादीत नाव आहे की नाही ते तपासून घ्या...पण ऐकतील तर शपथ...
रुपेश तणतणत कट्टयावर आला.
निरंजननं विचारलं त्याला, अरे काय झालं एवढं कावलायस का?
काय सांगू रे...मी नव्हतो इथे गेले काही दिवस, आॅफिसच्या कामानिमित्त पायाला चाकं लागल्यासारखा फिरतोय देशभर. परवा निवडणुका जाहीर झाल्या...तेव्हा म्हटलं की आपली नावं आहेत ना यादीत तपासून पाहूया. म्हणून निवडणूक आयोगाच्या साईटवर गेलो आणि पाहिलं तर आमची सगळ््यांची नावं होती पण आईचंच नाव नव्हतं. महापालिकेच्यावेळी केलं होतं तिनं मतदान. पण आता कसं काय गायब झालं ते कळलं नाही. मग पुन्हा नाव नोंदणी केली...
मग काय...आता तर ते केवढं सोपं झालं आहे. पटकन काम होतं आणि प्र्रतिसादही चांगला मिळतो.
हो रे ते झालंच. तत्काळ इमेलही आला आणि मतदानापूर्वी ओळखपत्रही येईलच.
मग...तणतणायाला काय झालं?
आपली दोस्तमंडळी रे...आमच्या बिल्डिंगमध्ये नुकतीच वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले तीन-चार जण आहेत. त्यांच्याकडे आता चौकशी केली...मतदारयादीत नाव नोंदवलं का याची...तर नाही म्हणाले...राहुन गेलं आता काय होणार?त्यांची आता शाळा घेतली. एवढे तुम्ही नेटसॅव्ही..़जरा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन पाहायचं ना...तिथे सगळं दिलं आहे. चटकन काम झालं असतं. त्यांचं अ‍ॅपपण आहे. जरा उत्साह दाखवायला नको तुम्हाला...एरव्ही...अरे ला कारे करण्याचं त्यांचं वय...पण आपण दोस्तासारखे वागवतो ना...त्याचाच फायदा घेतला आणि बोललो. लगोलग कागदपत्रं घेऊन या...आपण आजच आॅनलाईन नोंदणी करून टाकूया, असं सांगून...हा इकडे आलो.
व्वा, हे छान काम केलंस. मतदारयादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासून पाहणं, ओळखपत्र ताब्यात घेणं, मतदान केंद्र समजून घेणं हे आपलं कामच आहे. निवडणूक आयोगाची जाहिरात सतत सुरू असते. तरीही सगळे तेवढी काळजी घेत नाहीत....आणि मग मतदानाच्या दिवशी नाव सापडलं नाही की बोंबाबोंब सुरू करतात. गेल्या वेळी नाव होतं यावेळी का नाही...आम्ही काय आता याद्याच तपासत बसायच्या काय...
त्यांच्या एक लक्षात येत नाही...निवडणुका म्हणजे लोकशाहीची महाउत्सव आहे. त्यात भाषणांची, कुरघोड्यांची, आरोप-प्रत्यारोपाची, फोडाफोडीची रेलचेल असते...सगळं वातावरण ढवळून निघतं. मतदान करणं हे त्या उत्सवात सहभागी होऊन कर्तव्य बजावणं...त्यासाठी थोडीशी जागरुकता दाखवायलाच हवी. मतदान नाही केलं तर काहीतरी दंड करण्याची तरतूद का करत नाहीत, आपल्याकडे...
अरे , अशी सक्ती ही लोकशाहीचे लक्षण नाही. मतदान न करणं हाही एक हक्कच नाही का?
बरोबर...आता जातो घरी...ते चारजण येतील एवढ्यात... त्यांचे अर्ज भरायचे आहेत.
तुमचं काय...मतदारयादीतलं नाव तपासून पाहिलंत ना?

- म. हा.मुंबापुरीकर

Web Title: False chat ... 'Is there a name in the voters' list?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.