पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहीमजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 08:22 AM2017-10-19T08:22:49+5:302017-10-19T08:23:35+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.

failure of the signal system on the western railway route | पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहीमजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड 

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहीमजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड 

Next

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. माहीम रेल्वे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळांबा झाला आहे. बिघाड दुरूस्तीचे काम सुरू आले आहे.
सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने लगेचच दुरूस्तीचे काम तातडीनं हाती घेतले. पण रेल्वे सेवा 20 ते 25 मिनिटं उशिरानं आहे. 

Web Title: failure of the signal system on the western railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.