हज यात्रेसाठी अर्ज भरण्यास १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:06 AM2018-11-19T02:06:06+5:302018-11-19T02:06:24+5:30

२०१९ मधील हज यात्रेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये केंद्रीय हज समितीने १२ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. देशभरातून मुदत वाढविण्याची मागणी झाल्यानंतर त्याचा विचार करून ही मुदत वाढविण्यात आल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली.

Extension till December 12 to fill the application for Haj pilgrimage | हज यात्रेसाठी अर्ज भरण्यास १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

हज यात्रेसाठी अर्ज भरण्यास १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : २०१९ मधील हज यात्रेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये केंद्रीय हज समितीने १२ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. देशभरातून मुदत वाढविण्याची मागणी झाल्यानंतर त्याचा विचार करून ही मुदत वाढविण्यात आल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली.
हज यात्रेला जाण्यासाठी आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे. या दोन्ही पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, राज्य हज समितीकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार ही मुदत वाढविण्यात आली आहे. यामुळे १२ डिसेंबर, २०१८ पूर्वी किंवा तोपर्यंत बनविण्यात आलेल्या व ३१ जानेवारी, २०२० पर्यंत वैध असणारे पासपोर्टधारक यासाठी अर्ज करू शकतील, असा बदल मशिनमध्ये करण्यात आला आहे.
आॅनलाइन व आॅफलाइन अर्ज आल्यानंतर प्रत्येक राज्य हज समितीने त्याची माहिती २१ डिसेंबर, २०१८ पूर्वी भरून केंद्रीय हज समितीकडे पाठविण्यात यावे, असे निर्देश समितीने दिले आहेत. हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा व लवकरात लवकर अर्ज भरावे, असे आवाहन केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मक्सूद खान यांनी केले आहे.

Web Title: Extension till December 12 to fill the application for Haj pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.