Exclusive : 'नाणारचं श्रेय लाटणाऱ्या शिवसेनेचे जैतापूर प्रकल्पावर मौन का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 07:21 PM2019-03-20T19:21:55+5:302019-03-20T19:39:22+5:30

कोकणाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विद्यमान शिवसेना खासदारांनी काय केले? श्रेय लाटण्याचं काम फक्त केले. नाणार प्रकल्प शिवसेनेने आणला आणि स्वत:चं रद्द करुन श्रेय लाटलं

Exclusive: why shiv sena silence on Jaitapur Project Says Nitesh Rane | Exclusive : 'नाणारचं श्रेय लाटणाऱ्या शिवसेनेचे जैतापूर प्रकल्पावर मौन का?'

Exclusive : 'नाणारचं श्रेय लाटणाऱ्या शिवसेनेचे जैतापूर प्रकल्पावर मौन का?'

Next

मुंबई - नाणार प्रकल्प रद्द केला असं श्रेय शिवसेना लाटत आहे. मुळात नाणार प्रकल्प कोकणात शिवसेनेनेच आणला आणि स्वत:च रद्द करुन श्रेय घेतले. जैतापूर प्रकल्पाचं काम आज कोकणात सुरु आहे. काही वर्षापूर्वी शिवसेनेने जैतापूर प्रकल्पावर आंदोलन केले मग जैतापूर प्रकल्पावर शिवसेनेचे मौन का असा सवाल काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला केला आहे. 

या मुलाखतीत नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. कोकणाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विद्यमान शिवसेना खासदारांनी काय केले. श्रेय लाटण्याचं काम फक्त केले? नाणार प्रकल्प शिवसेनेने आणला आणि स्वत:चं रद्द करुन श्रेय लाटलं, जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेचे मौन का ? जैतापूर प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले मग सत्तेत असताना हा प्रकल्प रद्द का केला नाही असा सवाल नितेश राणेंनी विचारला 

विद्यमान शिवसेना खासदारांनी विनायक राऊत यांनी कोकणासाठी काय केले ? कोकण रेल्वे, सी-वर्ल्ड प्रकल्प, कारखाने, काजू-आंबा-मासेमारी यावर कोकणाचं अर्थकारण चालतं त्याकडेही गेली 5 वर्षे लक्ष दिलं नाही. एलईडी फिशिंगमुळे कोकणातील मच्छिमारांना आत्महत्या करण्याची वेळ आणली असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. लोकसभेत विद्यमान खासदार प्रश्न विचारताना पण दिसले नाही. विनायक राऊतांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या मतदारसंघासाठी काय केलं ? अनेक सरकारी योजना लोकांपर्यत पोहचवण्यात शिवसेना अपयशी ठरली हेच मुद्दे घेऊन लोकांसमोर जावू असं नितेश राणेंनी सांगितले 

तसेच ग्रामीण भागातील मतदार सुज्ञ असतात, त्यांना कोणाला निवडून द्यायचं हे माहीत असतात. ज्याला निवडून द्यायचं त्याचे नाव ते शोधतात, आम्हाला सक्षम खासदार हवा, सुशिक्षित उमेदवार हवा. त्यामुळे फ्रीज या चिन्हावर मतदान करुन निलेश राणेंना लोकं खासदार म्हणून निवडून देतील असा ठाम विश्वास आहे. तसेच आमचे खासदार निवडून आल्यानंतर केंद्रात मोदींना पाठिंबा देतील.

(Exclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम')

(Exclusive : नितेश राणे यांनी सांगितले 2014 मधील पराजयाचे कारण)

(Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा)

पहा व्हिडीओ 

 

Web Title: Exclusive: why shiv sena silence on Jaitapur Project Says Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.