एसटीमध्ये अधिकारी वर्गाची परीक्षा १७ ते १९ मेदरम्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:20 AM2019-05-17T01:20:08+5:302019-05-17T01:20:23+5:30

उमेदवारांना www.msrtcexam.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळतील.

Examination of the officers in the ST from May 17 to 19 | एसटीमध्ये अधिकारी वर्गाची परीक्षा १७ ते १९ मेदरम्यान

एसटीमध्ये अधिकारी वर्गाची परीक्षा १७ ते १९ मेदरम्यान

Next

मुंबई : एसटीच्या विविध वर्ग १ व २ अधिकारी पदासाठी आॅनलाइन परीक्षा १७, १८, १९ मे रोजी होणार असून या परीक्षेला ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत अशा पात्र उमेदवारांच्या परीक्षेची प्रवेशपत्रे एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
एसटीच्या वर्ग १ व २ अधिकारी पदाच्या उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाचा व इतर माहितीचा लघुसंदेश ई-मेल आणि मोबाइलवर पाठविण्यात येणार आहे. उमेदवारांना www.msrtcexam.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळतील. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी हजर राहणे बंधनकारक आहे. परीक्षा आॅनलाइन पद्धतीने होईल. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असून एकूण १०० प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी दीड तासाचा असेल.उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त झाले नसल्यास १८०० ५७२२ ००५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Web Title: Examination of the officers in the ST from May 17 to 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.