पायाभूत परीक्षेचा पेपर फुटला , परीक्षेला अर्थ राहिलेला नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 05:27 AM2017-09-13T05:27:37+5:302017-09-13T05:27:37+5:30

राज्यातील शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी राज्यभरातील सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांत घेण्यात येणाºया पायाभूत परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटला आहे. इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या विज्ञानाचा पेपर विद्यार्थ्यांच्या आधीच हाती पडला होता. दरवर्षी अशा प्रकारे पेपर फुटतो, त्यामुळे या परीक्षेला अर्थच राहिलेला नाही, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

 The examination of the examination of the basic examination was not broken | पायाभूत परीक्षेचा पेपर फुटला , परीक्षेला अर्थ राहिलेला नाही  

पायाभूत परीक्षेचा पेपर फुटला , परीक्षेला अर्थ राहिलेला नाही  

Next

मुंबई : राज्यातील शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी राज्यभरातील सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांत घेण्यात येणाºया पायाभूत परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटला आहे. इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या विज्ञानाचा पेपर विद्यार्थ्यांच्या आधीच हाती पडला होता. दरवर्षी अशा प्रकारे पेपर फुटतो, त्यामुळे या परीक्षेला अर्थच राहिलेला नाही, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पायाभूत परीक्षेत मुलांना मिळणाºया परीक्षेतील गुणांवरून शाळेची श्रेणी ठरवण्यात येते. त्यामुळे राज्यातील शाळा ‘प्रगत’ असल्याचे दाखवण्यासाठी या परीक्षांमध्ये दरवर्षी गोंधळ घातला जातो. परीक्षेच्या नियमाप्रमाणे या परीक्षेचा पेपर शाळेत आॅनलाइन पद्धतीने पोहोचला पाहिजे. पण राज्यातील काही भागांत विजेचा प्रश्न, अन्य तांत्रिक अडचणी असल्यामुळे इयत्ता आठवी आणि नववीचे विज्ञानाचे पेपर शाळांना आधीच पाठविले होते. त्यामुळे पेपर फुटल्याचे मुंबई विभाग परीक्षा मंडळाचे माजी सदस्य उदय नरे यांनी सांगितले.
मुलांची पायाभूत परीक्षा घेण्यात सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. आताच्या परीक्षेसाठी पावणेदोन कोटींचा खर्च झाला. पेपरफुटीमुळे तो वाया गेल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यातील परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतली जाणार होती. आता पुन्हा पेपर फुटल्यामुळे त्यात गोंधळ निर्माण झाला आहे. नवीन परीक्षा कधी होणार हे माहीत नाही, अशी खंत नरे यांनी व्यक्त केली.

सचिवांना पत्र
सर्व शिक्षा अभियानाचे माजी राज्य प्रकल्प संचालक ज. मू. अभ्यंकर यांनी सांगितले की, पायाभूत परीक्षेसंदर्भात मंगळवारी मुख्य सचिव आणि शिक्षण सचिवांना पत्र पाठवले आहे. या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होत आहे. या व्यक्तींनाही वाढीव निकाल हवा असल्याने परीक्षेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. आधी परीक्षा घेताना वेगळ्या शाळेतील शिक्षक उत्तरपत्रिका तपासत होते. आता त्याच शाळेतील शिक्षक उत्तरपत्रिका तपासतात. त्यामुळे प्रत्येक जण हा आपल्या शाळेचा श्रेणी वाढावी म्हणून विचार करत असतो. हे चुकीचे आहे.

Web Title:  The examination of the examination of the basic examination was not broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा