नक्षलींंच्या देशद्रोही कारवायांचे पुरावे हाती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:13 AM2018-06-09T01:13:44+5:302018-06-09T01:13:44+5:30

नक्षलवाद्याच्या देशविरोधीचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले की, शहरी भागातील काही नक्षल समर्थकांना अटक झाली आहे.

Evidence of anti-trafficking activities of Naxalites - Chief Minister Devendra Fadnavis | नक्षलींंच्या देशद्रोही कारवायांचे पुरावे हाती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नक्षलींंच्या देशद्रोही कारवायांचे पुरावे हाती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई : नक्षलवाद्याच्या देशविरोधीचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले की, शहरी भागातील काही नक्षल समर्थकांना अटक झाली आहे. छाप्यांत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. नक्षलवाद्यांना कुठून व कसा पैसा येतो याचे पुरावेही मिळाले आहेत. हार्ड डिस्कही मिळाल्या आहेत. बंदुकीच्या जोरावर जंगलांत हिंसक कारवाया करणारे लोक एकीकडे तर ेत्यांच्या समर्थकांचा गट दुसरीकडे समाजाची दिशाभूल करीत आहे. त्यांची पाळेमुळे शोधली जातील.

मोदी यांच्या हत्येचा कट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजीव गांधींप्रमाणे हत्या केली पाहिजे, अशी सूचना नक्षलवाद्यांच्या एका नेत्याने केडरला दिल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. ही गंभीर बाब आहे. केंद्र व राज्याच्या तपास यंत्रणा याच्या मुळाशी जाऊन कारवाई करतील, असे ते म्हणाले.

तपास यंत्रणांकडून पुष्टी नाही!
राजीव गांधी यांची जशी हत्या केली तशीच देशातील एका बड्या नेत्याची हत्या करण्याचा कट पकडलेल्या नक्षलवाद्यांनी रचला होता, अशी माहिती सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांनी पुणे कोर्टात दिली. मात्र, हा बडा नेता म्हणजे नरेंद्र मोदीच असावेत, या माहितीला तपास यंत्रणांकडून अधिकृत पुष्टी मिळाली नाही. अ‍ॅड. पवार यांनीही पंतप्रधानांबाबतच कट होता का? हे सांगण्यास नकार दिला. आपण कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Evidence of anti-trafficking activities of Naxalites - Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.