'प्रत्येक महिला मतदान करणार, लोकशाहीला अधिक बळकट बनवणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 02:14 AM2019-04-03T02:14:40+5:302019-04-04T12:52:01+5:30

निवडणूक आयोगाचा विशेष उपक्रम : टिष्ट्वटरवर खास हॅशटॅग

'Every woman will vote, strengthen democracy' in india loksabha election | 'प्रत्येक महिला मतदान करणार, लोकशाहीला अधिक बळकट बनवणार'

'प्रत्येक महिला मतदान करणार, लोकशाहीला अधिक बळकट बनवणार'

Next

सचिन लुंगसे 

मुंबई : लोकसभा निवडणूकीदरम्यानमतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने जनजागृती सुरु आहे़ याच मोहीमेचा एक भाग म्हणून महिलांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे; याकरिता आयोगाने सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर जनजागृती हाती घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे आकर्षक अशा ओळीद्वारे ट्विटरवर महिला मतदारांचे लक्ष वेधले जात आहे़ मतदान करण्याचा संदेश पोहविला जात आहे.

निवडणूक आयोगाने टिष्ट्वटरवर आकर्षक ओळीद्वारे महिला मतदारांचे लक्ष वेधले असून, या ओळींमध्ये देशाचा इतिहास घडविण्यात महिलांचा समावेश आहे, मग भविष्य साकारण्यासाठी त्यांना मागे का ठेवावे. समानता केवळ बोलण्यापूरती नव्हे तर मतामधूनही दाखवा. तिला मत मांडण्याचा अधिकार आहे, मग निवडणूकीत मतदान करण्यापासून तिला का रोखता. जे हात घर चालतात, ते देश घडविण्यासाठी मागे का राहतात. तिला ही मतदानाचा अधिकार द्या, तिची ताकद तिच्या हातात आहे, तिच्या मतात आहे; या संदेशांचा समावेश असून, यामध्ये ग्राफीक्सही वापरण्यात आले आहेत. याद्वारे अधिकाधिक मतदान करतील, अशी आयोगाला आशा आहे़



टिष्ट्वटरवर याव्यतीरिक्त आणखी संदेश देण्यात आले असून, यात जगात सामर्थ्यवान महिला तिच असते, जिच्याकडे मतदानाची ताकद असते. मी देश घडविन, मी लोकशाही बळकट करीन. प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, तरीही मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास मागे का तू. घरामध्ये निर्णायक क्षमता ठेवणारी तू, मतदानाच्या प्रक्रियेत मागे कशी तू. आजच्या युगाची प्रगती तू, तरीही मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास मागे का तू. राणी झाशीची बळकट बाहू तू, तरीही मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास मागे का तू. ज्ञानाचा प्रसार करणारी विद्या तू, तरीही मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास मागे का तू; या आकर्षक संदेशांचा समावेश आहे.

महिला मतदार वाढल्या
च्२०१४ च्या तुलनेमध्ये महिला मतदार हजार पुरुषांमागे ८८९ वरुन ९११ अशा वाढल्या आहेत.
च्२००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती.
च्२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे.
च्२०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते.
च्२०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ इतके होते.
च्२०१९ मध्ये या प्रमाणात १ हजार पुरुषांमागे ९११ अशी सुधारणा झाली आहे.



हॅशटॅग
#लोकसभानिवडणूक२०१९
#मतदान
#माझेमतअमूल्य
#लोकसभाचूनाव२०१९
#देशकामहात्यौहार

सोशल मीडियावर जनजागृती मोहीम सक्रिय
च्लोकसभा निवडणूक २०१९ च्या आपल्या मतदारसंघातील निवडणुकांची तारीख पहा, आवर्जून मतदान करा.
च्मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हा, कोणीही मागे राहू नका.
च्चला मतदान करूया, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया, आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका.
च्आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार वाया घालवू नका. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदाराची भूमिका जरूर निभावा. अवश्य मतदान करा. मतदान करून सुजाण नागरिक व्हा, देशाच्या प्रगतीला हातभार लावा.



लोकसभानिहाय महिला मतदारांची संख्या

लोकसभा महिला मतदार
उत्तर मुंबई ७ लाख ३७ हजार ४०६
उत्तर पश्चिम मुंबई ७ लाख ६४ हजार ८८४
उत्तर पूर्व मुंबई ७ लाख ९ हजार २१७
उत्तर मध्य मुंबई ७ लाख ४७ हजार ४४२
दक्षिण मध्य मुंबई ६ लाख ५० हजार ९९
दक्षिण मुंबई ६ लाख ८८ हजार ५३७
 

Web Title: 'Every woman will vote, strengthen democracy' in india loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.