इंग्रजी माध्यमाच्या विज्ञानातही चुका; राज्य शिक्षण मंडळाच्या ज्ञानापुढे शिक्षणतज्ज्ञ हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 05:42 AM2018-04-24T05:42:52+5:302018-04-24T05:43:15+5:30

समितीवर टिका : राज्य शिक्षण मंडळाच्या ज्ञानापुढे शिक्षणतज्ज्ञ हतबल

Errors in English medium science | इंग्रजी माध्यमाच्या विज्ञानातही चुका; राज्य शिक्षण मंडळाच्या ज्ञानापुढे शिक्षणतज्ज्ञ हतबल

इंग्रजी माध्यमाच्या विज्ञानातही चुका; राज्य शिक्षण मंडळाच्या ज्ञानापुढे शिक्षणतज्ज्ञ हतबल

Next



मुंबई : दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात चुकांचा सिलसिला सुरूच असून, आता इंग्रजी माध्यमाच्या विज्ञानाच्या पुस्तकातील मजकुरात चुका असल्याचा आरोप शिक्षणतज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे पुस्तके आणि त्यातील मजकूर ठरविणारी समिती नेमकी तज्ज्ञ होती का, असा सवाल विचारला जात आहे. सोबतच राज्य शिक्षण मंडळ आणि बालभारतीच्या विषयाच्या समिती नियुक्तीवरही टीका होत आहे.विज्ञान-तंत्रज्ञान भाग २ या पुस्तकातील तब्बल ४० आकृत्या चुकीच्या असल्याचे नुकतेच समोर आले. त्यानंतर, आता इंग्रजी माध्यमाच्या विज्ञानाच्या पुस्तकात चुका आढळून आल्या आहेत. पुरुष आणि स्त्रीच्या प्रजनन संस्थेची माहिती देणाऱ्या मजकुराच्या तपशिलात या चुका आहेत. दोहोंच्या प्रजनन संस्थेत बरेच साम्य असले, तरी ते एकसारखे नसतात.
पुरुषांमध्ये आढळून येणाºया प्रोस्टेट ग्रंथी या एक नसून त्यांची जोडी असते. मात्र, पुस्तकात त्या प्रोस्टेट ग्रंथी एकच असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. याचसोबत स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेची माहिती देणाºया अनेक शब्दांतही चुका आढळल्या आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांपर्यंत चुकीची माहिती जाणार आहे. त्यामुळे यापुढे विद्यार्थी चुकीच्या संकल्पना घेऊनच अभ्यास करण्याचा धोका असल्याची भीती शिक्षणतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या मजकुराची अंतिम निवड होण्याआधी संबंधित विषयांच्या तज्ज्ञांकडून त्याबाबत खातरजमा करून घेण्यात यावी, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

प्रमाणीकरणाची प्रक्रियाच नाही
हा प्रश्न पुस्तकातील चुका दाखविण्याचा नसून, या चुका योग्य असल्याचे समजून विद्यार्थी भविष्यात नीटसारख्या परीक्षा देणार, हा आहे.
त्यामुळे पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर दुर्लक्ष करणे, ‘चलता है’ अशी भावना मनात ठेवून पुस्तकाचे काम करण्याचा हा मुद्दा आहे.
पाठ्यपुस्तक निर्मितीच्या टप्प्यावरही आपल्याकडे ‘कॉपी-पेस्ट’चा प्रकार सुरू झाला आहे. हे प्रकार टाळण्यासाठी बोर्डाकडे अभ्यासक्रम संशोधन आणि विकसन विभागाचे काम प्रभावीपणे असण्याची गरज आहे.
बोर्डाच्या पुस्तकांमधील मजकुराच्या बाबत प्रमाणीकरणाची प्रक्रियाच दिसून येत नाही, हे टाळणे आवश्यक आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम गांभीर्यानेच व्हायला हवे, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Errors in English medium science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.