एल्फिन्स्टन दुर्घटनेस रेल्वे सुरक्षा आयुक्त जबाबदार, माहितीच्या अधिकाराखाली माहिती उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 06:07 AM2017-11-21T06:07:43+5:302017-11-21T06:08:05+5:30

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिका-यांना क्लीन चिट दिलेली आहे.

Elphinstone is responsible for the accident safety commissioner, disclosure of information under the Right to Information Act | एल्फिन्स्टन दुर्घटनेस रेल्वे सुरक्षा आयुक्त जबाबदार, माहितीच्या अधिकाराखाली माहिती उघड

एल्फिन्स्टन दुर्घटनेस रेल्वे सुरक्षा आयुक्त जबाबदार, माहितीच्या अधिकाराखाली माहिती उघड

googlenewsNext

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिका-यांना क्लीन चिट दिलेली आहे. तथापि, एल्फिन्स्टन दुर्घटना ही रेल्वे अधिका-यांच्या कर्तव्यपूर्तीच्या अभावामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेला रेल्वे सुरक्षा आयुक्त जबाबदार असल्याची कागदपत्रे माहिती अधिकाराखाली प्राप्त झाली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, परळ-एल्फिन्स्टन स्थानकांना जोडणाºया पादचारी पुलाच्या बांधकामासाठी त्वरित मान्यता दिली नाही. त्वरित मान्यता मिळाली असती, तर हा अपघात झाला नसता, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वे प्रशासनास परळ पुलाबाबत गत ३ वर्षांत झालेल्या प्रगतीची माहिती मागविली होती. मध्य रेल्वेचे मंडळ अभियंता एस. के. श्रीवास्तव यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती देताना पत्र सादर केले.
१२ आॅक्टोबर रोजी आपले निरीक्षण दर्शविणारा अहवाल सुरक्षा आयुक्तांनी वरिष्ठांकडे सादर केला होता. यात स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असणे आणि रस्त्याकडे जाणाºया दिशेने बाहेर पडणे व आत येण्याचा मार्ग व्यवस्थित नाही, अशी निरीक्षणेदेखील नोंदविली होती.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी योग्य वेळी हा अहवाल सादर केला असता, तर एल्फिन्स्टन दुर्घटना टाळता आली असती, असे यावर माहिती अधिकार कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Elphinstone is responsible for the accident safety commissioner, disclosure of information under the Right to Information Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.