इलेक्ट्रॉनिक मीटरवर आरटीओचा ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:38 AM2018-02-20T06:38:27+5:302018-02-20T06:38:32+5:30

इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार करून रिक्षा, टॅक्सी चालक प्रवाशांची लुबाडणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या वाहनांवर

Electronic meter RTO 'watch'! | इलेक्ट्रॉनिक मीटरवर आरटीओचा ‘वॉच’!

इलेक्ट्रॉनिक मीटरवर आरटीओचा ‘वॉच’!

Next

मुंबई : इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार करून रिक्षा, टॅक्सी चालक प्रवाशांची लुबाडणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) रिक्षा, टॅक्सींची विशेष तपासणी हाती घेतली आहे. कुर्ला, अंधेरी, घाटकोपर या प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांत ही तपासणी सुरू झाली आहे.
चालक साध्या मीटरमध्ये फेरफार करत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आरटीओने इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती केली. ही सक्ती करताना इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार करणे शक्य नसल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र जोगेश्वरी येथे रिक्षा चालकाने मीटरमध्ये फेरफार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरटीओ यंत्रणा खडबडून जागी झाली. सदर रिक्षा चालकाविरोधात वडाळा आरटीओने जोगेश्वरी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी राज्याच्या वाहतूक विभागाचे प्रधान सचिव आणि परिवहन आयुक्त (अतिरिक्त भार) मनोज सौनिक यांनी ठाणे आरटीओला चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार मुंबई आरटीओनेदेखील मीटरमध्ये फेरफार करणाºया चालकांविरोधात तपासणी सुरू केली आहे. शहरातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या परिसरात अशा प्रकारच्या रिक्षा-टॅक्सी धावत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कुर्ला, भांडुप, विक्रोळी, नाहूर, मुलुंड या भागामध्ये तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रो स्थानकांच्या पट्ट्यात अर्थात घाटकोपर, अंधेरी या मार्गावरदेखील तपासणी सुरू केल्याची माहिती आरटीओच्या सूत्रांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार होणार नाही, असे म्हणत राज्यात रिक्षा, टॅक्सीमध्ये साध्या मीटरऐवजी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची सक्ती करण्यात आली.
मात्र आता इलेक्ट्रॉनिक मीटरमध्येही फेरफार झाल्याचे प्र्रकरण उघडकीस आल्यानंतर मीटर तयार करणाºयांवर
काय कारवाई होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

कुर्ला, भांडुप, विक्रोळी, नाहूर, मुलुंड, घाटकोपर, अंधेरी या प्रमुख मार्गांवर धावणाºया रिक्षा-टॅक्सींची तपासणी

Web Title: Electronic meter RTO 'watch'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.