निवडणुकीचा प्रचार ‘ताप’ला; कार्यकर्ते झाले उन्हाने बेजार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 01:52 AM2019-04-21T01:52:29+5:302019-04-21T01:52:42+5:30

पाणी, थंड पेयचा आधार; सकाळी सुरू झालेल्या यात्रा संपतात दुपारी

Election campaign to 'heat'; Workers were bazaar | निवडणुकीचा प्रचार ‘ताप’ला; कार्यकर्ते झाले उन्हाने बेजार

निवडणुकीचा प्रचार ‘ताप’ला; कार्यकर्ते झाले उन्हाने बेजार

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा फड जसजसा रंगत आहे; तसतसा उन्हाचा पाराही चढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या पावसानंतर येथील कमाल तापमानात घट झाली असली तरी मुंबईकरांना कमाल तापमानामुळे बसत असलेले उन्हाचे चटके कायम आहेत. महत्त्वाचे म्हणजे लोकसभेचा प्रचार आणि प्रसार रंगात आला असतानाच ‘ताप’दायक उन्हामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बेजार झाले आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरातील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई या सहाही लोकसभा मतदारसंघांतील राजकीय प्रचार आणि प्रसाराला रंग चढू लागला आहे. बहुतांशी उमेदवारांच्या रॅली सकाळी काढल्या जात असल्या तरी त्या संपता संपता दुपार होत आहे. परिणामी, दुपाराच्या तीव्र उन्हाचा तडाखा कार्यकर्त्यांना बसत असून, त्यापासून वाचण्यासाठी कार्यकर्त्यांकडून सर्रास टोप्यांचा वापर केला जात आहे. शिवाय शक्य तेथे रॅलीदरम्यान विश्रांती घेतली जात आहे. मदतीला पाणी, थंड पेय यांचा आधार घेतला जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे दुपारी एक ते चार या वेळेत ऊन जास्त असल्याने या वेळेत रॅली काढली जात नसल्याचे चित्र आहे. तर सायंकाळच्या रॅलीवर भर दिला जात असून, उत्तरोत्तर तापमान वाढतच जाणार असून, प्रचारही ‘ताप’णार आहे. दुपारपर्यंत प्रचार संपतो़ मात्र त्या वेळी उन्हाचे प्रमाण कमालीचे वाढलेले असते़ मात्र रोजंदारीवर असलेल्या कार्यकर्त्यांना प्रचारातून जाता येत नाही़ कोणाच्या घरी पाणी मिळाले किंवा काही क्षणाची उसंत घेणे, एवढेच त्यांना यात्रेत करता येते़ येत्या काही दिवसांत ऊन वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत़ या काळात कार्यकर्त्यांची उन्हामुळे दमछाक उडण्याची चिन्हे आहेत़

तापमान घटले
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

कोठे पडणार पाऊस
२१ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.
कोरडे हवामान
२२ ते २४ एप्रिलदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.

उष्णतेची लाट : २२ ते २४ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
अंदाज मुंबईचा
रविवारसह सोमवारी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २३ अंशाच्या आसपास राहील.

Web Title: Election campaign to 'heat'; Workers were bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.