भविष्यात ई-कार होतील स्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, February 20, 2018 3:40am

येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीसाठी लागणाºया लिथियमला पर्याय शोधण्यात येत असून ते संशोधन यशस्वी झाले तर भविष्यात ई-कार स्वस्त होतील

मुंबई : येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीसाठी लागणाºया लिथियमला पर्याय शोधण्यात येत असून ते संशोधन यशस्वी झाले तर भविष्यात ई-कार स्वस्त होतील, असा विश्वास महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे एमडी व सीईओ डॉ. पवन गोएंका यांनी व्यक्त केला. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स् २०१८’ या गुंतवणूकपरिषदेत झालेल्या ‘ई-वाहने व भविष्यातील ऊर्जाबचतीची साधने’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. गोएंका यांंनी २०३०पर्यंत १०० टक्के ई-वाहने कशी आणता येतील याचा रोडमॅप मांडला. जगातील ५० टक्के लिथियम हे दक्षिण अमेरिकेत असल्याचे सांगून डॉ. गोएंका म्हणाले, त्याची काळजी करण्याचे कारण नाही. बॅटरीसाठी लिथियमला पर्याय भविष्यात येऊ शकतो. त्यासाठीचे संशोधन सुरू आहे. यामुळेच पुढील पाच वर्षांत लिथियम बॅटरीची किंमत १०० डॉलर प्रति किलोव्हॅटने कमी होऊ शकेल. एका छोट्या इलेक्ट्रिक कारमध्ये साधारण १४ किलोव्हॅट तर मोठ्या कारमध्ये २३ किलोव्हॅट बॅटरी लागते. दुचाकीमध्ये साधारण ५ किलोव्हॅट बॅटरीची गरज असते. यानुसार, १०० डॉलरने बॅटरी स्वस्त झाल्यास छोटी मोटारही ८० हजारांनी स्वस्त होऊ शकेल. येत्या सहा महिन्यांत चार्जिंग स्टेशन्स देशात इलेक्ट्रिक वाहने आणण्यातील प्रमुख समस्या चार्जिंग स्टेशन्सची आहे. मात्र येत्या सहा महिन्यांत मुंबई व पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्सचे जाळे उभे करण्याची घोषणा डॉ. गोएंका यांनी केली.

संबंधित

...अन् विनोद कांबळी चक्क सचिन तेंडुलकरच्या पाया पडला!
'मेस्मा'वरून विधीमंडळात गदारोळ, राजदंड पळविला
रेखाच्या राज्यसभेच्या जागेवरून चढाओढ, अक्षय कुमार, जुही व गजेंद्र चौहानांची चर्चा
मनसे साफ फसली आहे, गर्तेत सापडली आहे; पीयुष गोयल यांचा टोला
रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांची निदर्शनं- विखे-पाटील

मुंबई कडून आणखी

‘अ‍ॅट्रॉसिटीबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी’ -  प्रकाश आंबडेकर
छाप्याची धमकी देत डॉक्टरकडून खंडणी, गुन्हा दाखल
बोरिवलीच्या दिव्यश्रीची गगनभरारी; इस्त्रोच्या परीक्षेत देशातून तिसरी
मंत्रालयात उंदीर महाघोटाळा! एका आठवड्यात मारले ३ लाख १९ हजार ४०० उंदीर ! एका मिनिटात ३२ उंदीर !!
वरिष्ठ आयपीएस अधिकारी व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

आणखी वाचा