जागेअभावी बांधणार ‘दुमजली’ शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:15 AM2018-05-22T02:15:28+5:302018-05-22T02:15:28+5:30

निविदा प्रक्रियेला सुरुवात : मुंबईत नवी १८ हजार ८१८ शौचकुपे

'Dumjjali' toilets to be constructed for want of free will | जागेअभावी बांधणार ‘दुमजली’ शौचालये

जागेअभावी बांधणार ‘दुमजली’ शौचालये

Next


मुंबई : भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय दुर्घटनेनंतर पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले होते. मात्र, जागेच्या टंचाईमुळे शौचालय बांधण्यात अडथळा येत असून, त्याचा फटका हागणदारीमुक्त मुंबई मोहिमेला बसत आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईत दुमजली शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच मुंबईकरांसाठी १८ हजार ८१८ शौचकुपे उपलब्ध होणार आहे.
मुंबईत सध्या ४५ हजार शौचालये आहेत. यापैकी बहुतांश शौचालये १८ वर्षे जुनी आहेत. त्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात मानखुर्द येथे शौचालयाचा भाग कोसळून तीनजण मृत्युमुखी पडले. त्यानंतर, मुंबईत सर्व सार्वजनिक शौचालयांचे महापालिकेने स्ट्रक्चरल आॅडिट सुरू केले आहे. मुंबईत सार्वजनिक शौचालयांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, जागेअभावी नवीन शौचालयांचे बांधकाम रखडले आहे.
त्यामुळे मागणीनुसार मुंबईत एक व दोन मजली शौचालय बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. १८ हजार ८१८ पैकी तीन हजार शौचालय दोन मजली असणार आहेत, तर काही जुनी शौचालये पाडून त्या जागी नवीन बांधण्यात येणार आहेत. यासाठी घनकचरा व्यवस्थापन खात्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. १८ हजार ८१८ शौचकुपींमध्ये ११ हजार १७० शौचकुपे पाडून त्या जागी नवीन १५ हजार ७७४ शौचकुपे बांधण्यात येणार आहेत.

पालिकेकडून वीज, पाणी व्यवस्था
महापालिकेमार्फ त या शौचालयांना पाणी आणि वीजपुरवठा करण्यात येईल. मलनिस्सारण वाहिनी नाही, त्या ठिकाणी सेप्टिक टँकची व्यवस्था करण्यात येणार आहे. लहान मुले, दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचकुपे
असणार आहेत.

११ हजार जुनी शौचालये
मुंबईत ११ हजार १७० शौचालये जुनी आहेत. त्या जागेवर १५ हजार ७७४ नवीन शौचालये बांधण्यात येणार आहेत.

४५ हजार मुंबईत शौचालये
मुंबईत सध्या ४५ हजार शौचालये आहेत. यापैकी बहुतांश शौचालये १८ वर्षे जुनी आहेत. त्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे.

Web Title: 'Dumjjali' toilets to be constructed for want of free will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई