पीडितेशी लग्न केल्याने जन्मठेपच्या आरोपीची आठ वर्षांत सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:46 PM2018-07-02T23:46:23+5:302018-07-02T23:46:32+5:30

कॉलेजमध्ये असताना फिस्कटलेल्या प्रेम प्रकरणाच्या रागातून जिला चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून विद्रुप केले तिच्याशीच आरोपीने आता विवाह केला आहे व तिच्या ‘प्लॅस्टिक सर्जरी’साठी तो स्वत:ची त्वचाही दान करणार आहे.

 Due to the marriage of the victim, the accused of life imprisonment is released in eight years | पीडितेशी लग्न केल्याने जन्मठेपच्या आरोपीची आठ वर्षांत सुटका

पीडितेशी लग्न केल्याने जन्मठेपच्या आरोपीची आठ वर्षांत सुटका

मुंबई : कॉलेजमध्ये असताना फिस्कटलेल्या प्रेम प्रकरणाच्या रागातून जिला चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून विद्रुप केले तिच्याशीच आरोपीने आता विवाह केला आहे व तिच्या ‘प्लॅस्टिक सर्जरी’साठी तो स्वत:ची त्वचाही दान करणार आहे, हे लक्षात घेऊन जन्मठेप झालेल्या आरोपीची आठ वर्षांच्या शिक्षेनंतर मुक्तता करण्याचा सहानुभुतीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील अनिल पाटील याचे तेथील कॉलेजमध्ये शिकणाºया एका मुलीशी बरेच दिवस प्रेम प्रकरण सुरु होते. एप्रिल २०१० मध्ये एकेदिवशी ती मुलगी दोन मैत्रिणींसोबत लेक्चरला जात असता अनिल तेथे आला व त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव केला. तिने नकार दिल्याच्या रागात अनिलने तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले होते. त्याने तिचा चेहरा व खांदा भजला होता. यातून अनिलवर खटला उभा राहिला तेव्हा घटना प्रत्यक्ष पाहणाºया दोन मैत्रिणींनी साक्ष दिली व त्याने अनिलवरील गुन्हा सिद्ध झाला. सत्र न्यायालयाने अनिल यास भादंवि कलम ३२६ अन्वये अ‍ॅसिडहल्ल्यासाठी दिली जाऊ शकणारी कमाल जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
याविरुद्ध उच्च न्यायालयात केलेल्या अपिलात अनिलने खालच्या न्यायालयाच्या दोषसिद्धीच्या निष्कर्षास आव्हान दिले नाही. फक्त गुन्हा ज्या परिस्थितीत घडला ते पाहता त्यासाठी दिलेली शिक्षा जास्त आहे, असा मुद्दा प्रामुख्याने मांडला.
अपिलावर न्या. भूषण गवई व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा अनिलच्या वकिलाने असे निदर्शनास आणले की, दरम्यानच्या काळात आरोपीने त्याच पीडित मुलीशी लग्न केले आहे. शिवाय तिच्या विद्रुप चेहºयावर कराव्या लागणाºया ‘प्लॅस्टिक सर्जरी’साठी तो स्वत:ची त्वचाही दान करणार आहे. त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला.

दोघांना सुखाने जगू द्या!

अनिल याने खरंच त्या पीडित मुलीशी लग्न केले आहे का, याची खातरजमा करण्यास न्यायालयाने पोलिसांना सांगितले. खरोखरच दोघांनी वर्षभरापूर्वीच लग्न केले आहे, असा पोलिसांनी दुजोरा दिला.सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून खंडपीठाने अनिलविरुद्धचा दोषसिद्धीचा ठपका कायम ठेवला.
मात्र आरोपी व पीडित मुलगी आता विवाह करून शांततेने आयुष्य जगू इच्छितात, असे दिसते. तसे त्यांना जगता यावे यासाठी आरोपीची जन्मठेप रद्द करून त्याऐवजी त्याने आत्तापर्यंत भोगलेला तुरुंगवास पुरेसा मानून त्याला सोडणे न्यायाचे होईल, असे म्हटले.

Web Title:  Due to the marriage of the victim, the accused of life imprisonment is released in eight years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग