रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरतेमुळे अवयव प्रत्यारोपण अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 05:26 AM2018-10-23T05:26:47+5:302018-10-23T05:27:05+5:30

प्राप्तकर्त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरेमुळे सप्टेंबर महिन्यात मुंबईत झालेल्या दोन अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचा निष्कर्ष जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीने काढला आहे.

Due to the lack of immune system organ transplantation failed | रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरतेमुळे अवयव प्रत्यारोपण अयशस्वी

रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरतेमुळे अवयव प्रत्यारोपण अयशस्वी

Next

मुंबई : प्राप्तकर्त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरेमुळे सप्टेंबर महिन्यात मुंबईत झालेल्या दोन अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचा निष्कर्ष जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीने काढला आहे.
सप्टेंबर महिन्यात मुंबईतील दोन खासगी रुग्णालयात एकाच अवयवदात्यामार्फत प्रत्यारोपित केलेल्या अवयवांत दोन प्राप्तकर्त्या रुग्णांचा मृत्यू ओढावला होता. या मृत्यूंचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीने विशेष चार सदस्यीय समितीची नियुक्ती केली. या समितीने प्राप्तकर्त्या रुग्णाच्या शरीरातील प्रतिकारक शक्ती कमी असल्याने अवयवांचा स्विकार केला नाही. त्यामुळे मृत्यू ओढावल्याचे स्पष्ट केले.
समितीच्या अध्यक्षपदी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे होते. तर याशिवाय, प्रा. एन.के.हसे, प्रा.डी.आर.कर्नाड आणि प्रा. डॅरीयस मिर्झा यांचा समावेश होता. याखेरीज, समितीने अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याकरिता काही सूचना दिल्याची माहिती जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. एस.के.माथुर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी, यातील काही सूचनांविषयी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील भागधारकांशी चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, असेही माथुर यांनी सांगितले. त्या सूचनांमध्ये प्रत्यारोपण करण्यात येणारे अवयव जास्त तास बाहेर ठेवणे, एचएलएद्वारे अवयव दाता आणि प्राप्तकर्त्याची चाचणी करणे आणि अवयव प्रत्यारोणासाठी जतन करण्याची प्रक्रियेत नवे संशोधन करणे या सूचनांचा समावेश आहे.
सप्टेंबर महिन्यात अवयवदान झाल्यानंतर घडलेल्या दोन मृत्यूमुळे या प्रकरणांच्या अभ्यासाकरिता ही समिती कार्यरत होती.

Web Title: Due to the lack of immune system organ transplantation failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.