बेस्ट संपामुळे चाकरमान्यांचे दुसऱ्या दिवशीही हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 02:25 AM2019-01-10T02:25:04+5:302019-01-10T02:26:06+5:30

संपकºयांबाबत संताप : टॅक्सी, ओला, उबर, रिक्षाचालकांची कमाई; काही ठिकाणी अतिरिक्त प्रवास भाडे

Due to the best strike, the Chakarmanis | बेस्ट संपामुळे चाकरमान्यांचे दुसऱ्या दिवशीही हाल

बेस्ट संपामुळे चाकरमान्यांचे दुसऱ्या दिवशीही हाल

Next

मुंबई : मुंबईत बेस्टचा संप सलग दुसºया दिवशीही सुरू राहिल्याने, मुंबईकरांना मंगळवारप्रमाणे बुधवारीदेखील त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संपकरी बेस्ट कर्मचाºयांबाबत संतापाचे वातावरण होते. बससेवा नसल्याने प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा, मेट्रो, एसटी यासारख्या वाहनांवर अवलंबून राहावे लागले. परिणामी, कालच्या प्रमाणेच आजदेखील या वाहनचालकांची मनमानी प्रवाशांना सहन करावी लागली.

पश्चिम उपनगरातल्या रस्त्यावर बुधवारीही बेस्ट धावली नाही. परिणामी, प्रवाशांना खासगी बस, रिक्षा, ओला, उबेर आणि मेट्रोने प्रवास करावा लागला. वांद्रे, मजास, मरोळ, गोरेगाव, ओशिवरा, दिंडोशी, मालाड, मागाठाणे, दहिसर, गोराई या विविध आगारांमध्ये बेस्ट वाहक व चालकांची उपस्थिती नव्हती. अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनच्या बाहेरून प्रवाशांच्या सोयीसाठी अंधेरी ते वर्सोवा आणि अंधेरी ते लोखंडवाला या मार्गावर खासगी बससेवा पुरविण्यात आली होती. प्रति व्यक्ती २० रुपये भाडे आकारले जात होते, अशी माहिती नीलेश खैरे यांनी दिली. गोरेगाव स्टेशन ते आयटी पार्क-न्यू म्हाडासाठी गोरेगाव स्टेशनपासून खासगी बससेवा सुरू होती, तर रिक्षा, ओला उबेर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होत्या. बेस्ट संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून मुंबई मेट्रो वन कंपनीने सकाळपासूनच मेट्रोच्या रोज चालणाºया ४४० फेºयामध्ये १२ अतिरिक्त जादा फेºया वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर सोडल्या होत्या. अंधेरी व घाटकोपर स्थानकावर मेट्रोने प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आज सुमारे ४.५ लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.

पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर आणि साकीनाका परिसरात प्रवाशांचे मोठे हाल झाले. कुर्ला पश्चिमेकडील कमानी येथून घाटकोपर, विद्याविहार आणि कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध नव्हत्या. शेअर रिक्षा आणि मीटर रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांचे झाले. येथून सांताक्रुझ, वांद्रे, अंधेरी आणि विलेपार्ले रेल्वे स्थानक गाठण्यासाठीही प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागली.

जादा पैसे देऊनही रिक्षा नाही
च्जरीमरीहून कुर्ला रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रति व्यक्ती पंधरा रुपये आकारले जातात. मात्र, संपादरम्यान प्रति व्यक्ती तीस रुपये आकारले जात होते, अशी माहिती प्रवाशांनी दिली, परंतू तीस रुपये देऊनही रिक्षा मिळत नसल्याची स्थिती होती.
च्लाल बहादूर शास्त्री मार्गावरून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या त्रासात वाहतूककोंडीने आणखी भर घातली. सकाळी आणि दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कोंडी असल्याने प्रवाशांचा अर्धाधिक वेळ वाया गेला. सकाळप्रमाणेच सायंकाळी प्रवाशांच्या त्रासात भरच पडली होती.

प्रवाशांनी घेतला खासगी वाहनांचा आधार
रिक्षासाठी लांबच लांब रांगा, अवास्तव भाडे आणि खासगी वाहन चालकांच्या अरेरावीचा प्रवाशांना सामना करावा लागला. पश्चिम उपनगरातील विविध बस आगारामध्ये दुसºया दिवशीही शुकशुकाट होता. बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी ते वांद्रेपर्यंत सर्व आगारातील बसेस बंद होत्या. पहिल्या दिवशी प्रवाशांना संपाचा फटका बसल्याने, अनेक प्रवाशांनी घरातून लवकर बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबला. नाक्याच्या ठिकाणी प्रवाशांच्या रिक्षासाठी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांनी घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय वापरला. काही प्रवाशांनी रेल्वे स्थानकापर्यंत पायी चालत जाण्याचा मार्ग स्वीकारला. पश्चिम द्रुतगती महामार्गावरदेखील प्रवाशांना मोठा त्रास झाला. दोन दिवसांच्या संपामुळे प्रवाशांची बिकट अवस्था झाली. प्रवाशांनी खासगी वाहनांचा उपयोग केला, परंतु खासगी वाहनचालकांनी संपाचा फायदा घेत भाडे वाढवून प्रवाशांची लूट केली.

एसटीकडून ७६ जादा बसेस, दीडशेहून अधिक फेºया
बेस्ट कर्मचाºयांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुसºया दिवशीही मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने सकाळपासून एकूण ७६ जादा एसटी बसेस सोडल्या होत्या. सायंकाळपर्यंत या बसेसने दीडशेहून अधिक फेºया पूर्ण करीत प्रवासी वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला.

संपाच्या पहिल्याच दिवशी सकाळी एसटी प्रशासनाने सुरुवातीला ४० बसेस सोडत मुंबईकरांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मिळालेल्या प्रतिसादानंतर एसटीने दुपारनंतर एकूण ५५ जादा बसेस सोडल्या होत्या. या बसेसने सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १२३ फेºया पूर्ण केल्या होत्या. मुंबईकरांच्या वाढती मागणीला पूर्ण करण्यासाठी एसटी प्रशासनाने बुधवारी ७६ एसटी बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी सोडल्या. त्यात कुर्ला पूर्वेकडून माहूल आणि कुर्ला पश्चिमेकडून वांद्रेपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना प्रत्येकी ८ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, तर घाटकोपर ते माहूल प्रवासासाठी एसटीच्या तीन बसेस धावत होत्या. कुर्ला पश्चिमेकडून सांताक्रुझ, तर अंधेरी पूर्वेकडून स्पेस आणि दादरहून मंत्रालयाला जाणाºया प्रवाशांसाठी प्रशासनाने प्रत्येकी ५ बसेस सोडल्या होत्या. बोरीवली ते सायन गाठण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने २ एसटी बसेसची व्यवस्था केली होती.

ठाण्याहून मुंबईकडे मोठ्या संख्येने प्रवास करणाºया प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने १५ बसेस सोडल्या होत्या. नवी मुंबईकरांना मुंबई गाठताना समस्या येऊ नये, म्हणून प्रशासनाने पनवेल ते मंत्रालय प्रवासासाठी ५ बसेसची व्यवस्था केली होती. याउलट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मंत्रालय आणि कुलाबा गाठण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी प्रत्येकी १० बसेस तैनात केल्या होत्या. अशाप्रकारे एकूण ७६ बसेसने दीडशेहून अधिक फेºया पूर्ण करत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Due to the best strike, the Chakarmanis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.