डॉ.अमोल कोल्हेंनी मालिकेसाठी घर गहाण ठेवलंच नाही, जाणून घ्या खरं अन् खोटं काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 01:18 PM2019-04-11T13:18:33+5:302019-04-11T13:20:16+5:30

डॉ. अमोल कोल्हेंनी मालिकेचा टीआरपी वाढवा आणि मराठी मालिकेत पहिल्या क्रमांकाची ही मालिका ठरावी

Dr. Amol Kolheny does not have a house mortgage for the sambhaji maharaj series; Know what is it? | डॉ.अमोल कोल्हेंनी मालिकेसाठी घर गहाण ठेवलंच नाही, जाणून घ्या खरं अन् खोटं काय ?

डॉ.अमोल कोल्हेंनी मालिकेसाठी घर गहाण ठेवलंच नाही, जाणून घ्या खरं अन् खोटं काय ?

Next

मुंबई - महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघातील उमेदवार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या घराबद्दलचा वाद चव्हाट्यावर आला आहे. जर, अमोल कोल्हेंची संपत्ती 5 कोटी रुपये आहे, तर मग त्यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेसाठी त्यांनी घर गहाण ठेवल्याची अफवा असल्याचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं होत. तसेच या प्रकरणावरुन कोल्हेंना ट्रोलही करण्यात आलं. मात्र, याबाबत कोल्हे समर्थकानेही पत्राद्वारे खुलासा केला आहे.   

डॉ. अमोल कोल्हेंनी मालिकेचा टीआरपी वाढवा आणि मराठी मालिकेत पहिल्या क्रमांकाची ही मालिका ठरावी, यासाठी घर गहाण ठेवल्याची बातमी पेरल्याचा आरोप आढळराव पाटील समर्थक शिवसैनिकांनी केला होता. तसेच कोल्हे यांच्या संपत्तीची तपशीलवार माहिती देण्याची मागणीही पाटील समर्थकांनी केली होती. त्यावर, कोल्हे समर्थकांनी फेसबुकवर पत्र लिहून स्पष्टीकरण देत या घटनेचा खुलासा केला आहे. 

फेसुबकवरील पत्र ''जसेच्या तसे''

अस्सल सोन्याला आगीची भीती नसते ...
''आढळरावांचे लावारीस अंध भक्त डॉ अमोल कोल्हेंवर आरोप करताना देवाने दिलेल्या मेंदूचा बिलकुल उपयोग करताना दिसून येत नाही. डॉ अमोल कोल्हे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता दोन्ही मिळून ४ कोटीच्या आसपास आहे. यातील स्थावर मालमत्ता वडिलोपार्जित असून सरकारी नियमांनुसार त्यांची चालू बाजारभाव किंमत देण्यात आली आहे. डॉ अमोल कोल्हे मुंबई मधील घराचे जॉईंट ओनर असून त्यांच्या पत्नी सुद्धा घराच्या ओनर आहेत आणि त्यांनी ते सारस्वत बँक मधून हौसिंग लोण घेऊन घेतलेलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी कधीही सांगितलं न्हवतं कि त्यांनी शिवसेनेच्या खासदाराकडे मदत मागितली म्हणून, ते पुणे जिल्ह्यातील एक खासदार अस नेहमी म्हणाले परंतु शिवसेनेचे खासदार जेवढ्या तत्परतेने या विषयावर प्रतीउत्तर देताना दिसतात याचं नेमके कारण स्वतः शिवसेनेच्या खासदारांनाच ठाऊक असेल. चोराच्या मनात चांदणं असा तर प्रकार नाही आहे ना हा नक्की.
राहिली गोष्ट डॉ अमोल कोल्हे यांनी स्वतःहून कधीच घर विकल्याचं भांडवल केलं नाही. त्यांच्या रेकॉर्ड झालेल्या फोन कॉल मधून आपल्या सर्वाना हि गोष्ट समजली. त्यांनी स्वतःही कधी कुठल्याही व्यासपीठावरून हि गोष्ट सांगून भांडवल केली नाही किंवा करणार पण नाहीत. आढळराव तुमच्या आणि डॉ अमोल कोल्हे यांच्या संस्कृती खूप फरक आहे ते आम्ही कित्येक वेळा पाहिलं मग ते जातीचा उल्लेख असो किंवा स्टेजवर महाराजांच्या पुतळ्यासमोर चपला घालून बसणं !

अढळसेना संभाजी महाराज आणि अमोल कोल्हे यांचा एवढा तिरस्कार करते कि यांनी सिरीयल बंद व्हावी व अमोल कोल्हेंवर कारवाई व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. ह्यांना अमोल कोल्हे यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? शिवसेनेकडे प्रचारासाठी शिरूर च्या विकासासाठी कोणताही ठोस कार्यक्रम नाही आहे म्हणून ते डॉ अमोल कोल्हेंवर वैयक्तिक आरोप करून जनतेची दिशाभूल करतायेत. आढळरावांना शिरूर च्या जनतेला स्वतःचे कर्तृत्व सांगण्यासारखे काहीच नसल्याने आणि त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागल्याने अश्या वैचारिक दिवाळखोरीतून ते आता चाललेले आहेत. देव त्यांना मानसिक स्वास्थ्य देवो !

अस्सल सोन्याला आगीची भीती नसते जेवढी आग जास्त तेवढी झळाळी जास्त !
ता.क. डॉ. अमोल कोल्हे यांनी विकलेल्या घराचा पत्ता 
K-10 आंबेकर नगर 
परळ गांव, मुंबई 12
स्थानिक नगरसेवक आमदार खासदार शिवसेनेचे आहेत, हवे असल्यास खात्री करून घ्यावे.
 

Web Title: Dr. Amol Kolheny does not have a house mortgage for the sambhaji maharaj series; Know what is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.