पियुष गोयल यांच्याशी चर्चा फोल, आझाद मैदानावर वाहतूकदारांचे निदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 04:55 PM2018-07-20T16:55:43+5:302018-07-20T16:56:19+5:30

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत रात्री उशीरा झालेल्या चर्चेनंतरही मालवाहतुकदारांच्या मागण्यांवर तोडगा निघू शकलेला नाही.

Discussion with Piyush Goyal Explains the traffic conveyors at Fol and Azad Maidan | पियुष गोयल यांच्याशी चर्चा फोल, आझाद मैदानावर वाहतूकदारांचे निदर्शन

पियुष गोयल यांच्याशी चर्चा फोल, आझाद मैदानावर वाहतूकदारांचे निदर्शन

Next

मुंबई - केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत रात्री उशीरा झालेल्या चर्चेनंतरही मालवाहतुकदारांच्या मागण्यांवर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे उद्या म्हणजेच शनिवारीही आंदोलन सुरू राहण्याची शक्यता तूर्तास व्यक्त केली जात आहे. शहरातील मशिद बंदर येथील बहुतांश व्यापाऱ्यांनी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देत आज व्यापार बंद ठेवला आहे. तर आझाद मैदानावर मालवाहतूकदारांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

इंधन दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी आज देशभरातील मालवाहतूकदारांनी संप पुकारला आहे. या बेमुदत देशव्यापी संपात राज्यातील १३ लाखांहून अधिक व्यावसायिक वाहने सहभागी होत असून, त्यात ट्रक, खासगी बसेस, टँकर व टेम्पो यांचा समावेश आहे. संपात राज्यातील १० लाख ट्रकमालक सहभागी झाले आहेत. दीड लाख टेम्पोमालकही संपात सहभागी होत आहेत. या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनही सहभागी झाल्याने राज्यातील स्कूल बस व व्हॅन बंद राहणार आहेत.

टँकरमालकांनीही संपाला पाठिंबा दिल्याने दूध, पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. राज्यातील १ लाखपैकी ३० टक्के टँकर्स तेल कंपन्यांकडे आहेत. ते संपात नसले तरी उर्वरित टँकर्सद्वारे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होणार नाही. संपकाळात वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहतील. संपात नसलेल्यांना पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. संपकाळात एसटी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बसेसचा वापर केला जाईल.

Web Title: Discussion with Piyush Goyal Explains the traffic conveyors at Fol and Azad Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.