वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने थकविले २३ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 07:28 AM2018-12-16T07:28:09+5:302018-12-16T07:28:33+5:30

थकीत बिलांच्या फाइल्स मंत्रालयात खोळंबल्या : पुरवठादार संघटनेचे सरकारला साकडे

The Directorate of Medical Education has tired of 23 crores | वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने थकविले २३ कोटी

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने थकविले २३ कोटी

Next

मुंबई : राज्यातील नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत शस्त्रक्रियेच्या साहित्यासह अन्य वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशनचा तब्बल २३ कोटींचा निधी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने थकविला आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार, पाठपुरावा करूनही थकीत बिलाची पूर्तता होत नसल्याचे सांगत या बिलांच्या फाइल्स मंत्रालयात खोळंबल्याची तक्रार आॅल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशनने केली आहे.

ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशनच्या माध्यमातून या थकीत बिलांच्या मागणीसाठी १ ऑक्टोबर रोजी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर त्वरित याविषयी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने बैठक बोलावून थकीत बिलाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याला दोन महिने उलटले असून अजूनही वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने हालचाल केली नसल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१७ पासून राज्यातील नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय व शस्त्रक्रियेच्या उपकरणांचा पुरवठा सुरळीत असूनही कोटींच्या घरातील बिलाची पूर्तता केलेली नाही. काही वैद्यकीय महाविद्यालयांचे बिल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने मान्य केले असले तरी मंत्रालयात मात्र या फाइल्स धूळ खात पडल्या आहेत.

थकीत बिलाच्या रकमा
च्अकोला वैद्यकीय महाविद्यालय - ४० लाख ५२ हजार २३२ रुपये च्औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय - २ कोटी ६७ लाख १६ हजार ८५८ रुपये च्सर्वोपचार रुग्णालय, धुळे - ४ कोटी २१ लाख ९४ हजार ८११ रुपये च्यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालय - १ कोटी ३२ लाख ८५ हजार ५१० रुपये च्नांदेड वैद्यकीय महाविद्यालय - ३१ लाख ७७ हजार २७५ रुपये च्लातूर वैद्यकीय महाविद्यालय - २ कोटी १९ लाख ८२ हजार ३५३ रुपये च्कामा रुग्णालय - ६ कोटी रुपये

च्जी.टी. रुग्णालय - २८ लाख १० हजार २९८ रुपये
च्सेंट जॉर्ज रुग्णालय - २ कोटी ७३ लाख ४ हजार २६३ रुपये

Web Title: The Directorate of Medical Education has tired of 23 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.