पदवी प्रवेश प्रक्रिया; अंतिम गुणवत्ता यादीतही कला, वाणिज्यच वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 06:12 AM2019-06-25T06:12:39+5:302019-06-25T06:12:57+5:30

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी जाहीर झाली.

Degree entry process; Arts and Commerce are on top of the list | पदवी प्रवेश प्रक्रिया; अंतिम गुणवत्ता यादीतही कला, वाणिज्यच वरचढ

पदवी प्रवेश प्रक्रिया; अंतिम गुणवत्ता यादीतही कला, वाणिज्यच वरचढ

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी जाहीर झाली. तिसऱ्या यादीतही अनेक नामंकित महाविद्यालयांचा कटआॅफ चढाच म्हणजे नव्वदीपार राहिला. त्यामुळे ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांत प्रवेशाची दारे बंदच झाली आहेत. महाविद्यालयांच्या ३ गुणवत्ता याद्यांमध्ये यंदा पारंपरिक अभ्यासक्रमांत कला आणि वाणिज्य शाखेत चढाओढ पाहायला मिळाली. सेल्फ फायनान्स कोर्सेसची पसंती कायम असल्याचे दिसून आले.
पहिल्या दोन गुणवत्ता याद्यांमधील कला, वाणिज्य शाखेच्या कटआॅफमध्ये चढाओढ पाहायला मिळाली असली, तरी यंदा पारंपरिक अभ्यासक्रमांत कला शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली. नामांकित महाविद्यालयांतील कला शाखेच्या जागा तर दुसºया यादीतच भरल्या गेल्यामुळे, तिसºया यादीत विद्यार्थ्यांना कला शाखेसाठी जागा उपलब्ध झाल्या नसल्याचे चित्र होते. तिसºया आणि अंतिम गुणवत्ता यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता कोणत्या महाविद्यालयांत जागा रिक्त आहेत, याचा प्रवेशासाठी शोध घ्यावा लागेल. तर तिसºया यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.
रिक्त जागांसाठी पुन्हा होणार नोंदणी
नेहमीप्रमाणे वाणिज्य आणि कला शाखेसाठीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नामांकित महाविद्यालयांनाच प्राधान्य दिल्याने, इतर छोट्या महाविद्यालयांतील जागा रिक्तच राहतील. या जागांचे प्रवेश आता महाविद्यालयीन स्तरावर होणार असून, त्यासाठी पुन्हा नोंदणी प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Degree entry process; Arts and Commerce are on top of the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.