अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?  - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 07:44 AM2018-11-23T07:44:13+5:302018-11-23T07:44:20+5:30

Ram Mandir : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिरप्रश्नी 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दिवशी विश्व हिंदू परिषद, संघ परिवाराच्याही सभांचं तेथे आयोजन करण्यात आलं आहे. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी आरएसएससहीत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.  

declare the date of creation of the Ram Mandir temple, Uddhav Thackeray criticized BJP Government over Ram Mandir | अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?  - उद्धव ठाकरे

अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?  - उद्धव ठाकरे

Next

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेराम मंदिरप्रश्नी 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दिवशी विश्व हिंदू परिषद, संघ परिवाराच्याही सभांचं तेथे आयोजन करण्यात आलं आहे. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी आरएसएससहीत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.  

''आमच्या अयोध्या यात्रेने कुणाचे ‘ब्लडप्रेशर’ वाढले आहे तर मुठीतील राजकीय हिंदुत्वाची वाळू सरकू लागल्याने काहींच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. राममंदिर हा विषय असा हातून निसटू लागला तर 2019च्या रोजीरोटीचे काय, या पक्षघाती झटक्याने अनेकांच्या जिव्हा पांगळ्या झाल्या. तेव्हा काहीही करून शिवसेनेस रोखा अशी गिधाडे ज्यांच्या मनात फडफडू लागली आहेत त्यांना आमचा पुनःपुन्हा तो आणि तोच सवाल आहे की, हे इतके कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?'', असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

(उद्धव ठाकरेंचा दौरा; अयोध्येत सुरक्षेत वाढ)

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे -
- आम्ही अयोध्येत जाण्याची घोषणा करताच स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणार्‍यांच्या पोटात मुरडा का यावा? रामाच्या नावावर मतांचा कटोरा घेऊन दारोदार फिरावे व निवडणुकांचा मोसम येताच सभा-संमेलनांतून ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्याव्यात ही जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही. 
- अनेकांच्या विजारी ढिल्या का पडाव्यात? अयोध्या मक्का-मदिनेत नसून आमच्या हिंदू भूमीतच आहे. त्यामुळे पासपोर्ट- व्हिसा वगैरेची काही लचांडं नाहीत. 
- हिंदुत्वाचे राजकारण करणार्‍यांची भगवी वस्त्रे चिंतेने पांढरी झाली असतील तर त्यांचे भगवेपण तपासून घ्यावे लागेल. अयोध्या ही कुणाची खासगी जागा नाही. अयोध्येत आता रामराज्य राहिले नसून सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आहे. 
- अयोध्येत इतक्या शिवसैनिकांचे काम काय, त्यांचा काही अंतस्थ हेतू वगैरे नाही ना अशा शंका उपस्थित का कराव्यात? तसे करण्यापेक्षा मेहेरबान सरकारने राममंदिर निर्माणाची तारीखच घोषित करून सगळ्या शंकाकुशंका शरयूच्या पात्रात कायमच्या बुडवून टाकाव्यात. 
- ज्या श्रद्धेने पंतप्रधान मोदी हे नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरात जातात, ज्या आस्थेने पंतप्रधान वाराणसीस गंगारतीस जातात, तितक्याच श्रद्धेने आम्ही अयोध्येत जात आहोत. 
- आम्ही जात आहोत त्याच दिवशी म्हणे अयोध्या परिसरात विश्व हिंदू परिषद, संघ परिवाराची ‘संतसभा’ आहे. आम्ही अयोध्येत पोहोचण्याचे ‘टायमिंग’ किंवा ‘मुहूर्त’ त्यांनी निवडला त्याबद्दल त्यांना विनम्र वंदन! 
-  राममंदिर निर्माणाची तारीख जाहीर करून का टाकत नाही? हे इतके कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?  
- आमच्या अयोध्या यात्रेमुळे अनेकांच्या नाडीचे ठोके चुकले आहेत व अनेकांच्या नाड्या सुटल्या आहेत. म्हणूनच आम्ही सांगतोय, ‘ठाकरे’ अयोध्येत निघाले आहेत, पण मंदिर निर्माणाची तारीख तुम्हीच आम्हाला सांगा.

Web Title: declare the date of creation of the Ram Mandir temple, Uddhav Thackeray criticized BJP Government over Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.