सोहराबुद्दीन बनावट चकमकीचा डिसेंबरअखेर फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 06:03 AM2018-12-08T06:03:48+5:302018-12-08T06:04:19+5:30

सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसरबाई आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय २१ डिसेंबर रोजी निकाल देणार आहे.

Decision on Sohrabuddin fake encounter | सोहराबुद्दीन बनावट चकमकीचा डिसेंबरअखेर फैसला

सोहराबुद्दीन बनावट चकमकीचा डिसेंबरअखेर फैसला

Next

मुंबई : सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसरबाई आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय २१ डिसेंबर रोजी निकाल देणार आहे. २००५ मध्ये गुजरात पोलिसांनी सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कौसरबाई यांची हत्या केली. तर या खटल्यातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीराम प्रजापती याची हत्या २००६ मध्ये करण्यात आली. या तिघांनाही चकमकीत ठार केल्याचा गुजरात व राजस्थान पोलिसांचा दावा आहे. तर सीबीआयने या तिघांनाही बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचा दावा केला आहे.
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास गुजरात सीआयडीने केला. त्यानंतर २०१० मध्ये हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आणि २०१२ मध्ये या प्रकरणाचा खटला मुंबई न्यायालयात वर्ग करण्यात आला. मी या खटल्याचा २१ डिसेंबरला निकाल देईन, असे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. एस. जे. शर्मा यांनी म्हटले आहे. जर २१ डिसेंबरला निकाल दिला नाही तर २४ डिसेंबरला देईन, असेही न्या. शर्मा यांनी स्पष्ट केले. या खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला ३ डिसेंबरपासून सुरुवात झाली होती आणि दोनच दिवसांत ती पूर्ण करण्यात आली.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, २००५ ते २००६ मध्ये गुजरात व राजस्थान पोलिसांच्या एकत्रित पथकाने शेख आणि प्रजापती यांची हत्या केली. या प्रकरणी २२ पोलीस अधिकाऱ्यांवर खटला चालविण्यात आला. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशिवाय १५ वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांची २०१४ ते २०१८ दरम्यान आरोपमुक्तता करण्यात आली आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयात २१० साक्षीदारांची साक्ष नोंदविली, त्यापैकी ९२ साक्षीदार ‘फितूर’ जाहीर करण्यात आले. सीबीआयचे वकील बी. पी. राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, घटनेच्या पाच वर्षांनंतर त्यांनी तपासास सुरुवात केली आणि १२ वर्षांनंतर साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यास सुरुवात झाली. काही महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाल्याने खटल्याची हानी झाली आहे.
तुमचा दोष नाही
‘मी सीआयडी किंवा सीबीआयला दोष देत नाही. साक्षीदारांचे जबाब आहेत आणि साक्षीदारही आहेत. येथे येऊन
जर त्यांनी भलतेच काही सांगितले त्यात तुमचा दोष नाही. तुम्ही तुमचे कर्तव्य केले,’ असे न्यायाधीशांनी म्हटले.

Web Title: Decision on Sohrabuddin fake encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.