मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मेट्रोच्या 'या' मार्गावरील विस्तारीकरणाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 03:31 PM2018-09-11T15:31:36+5:302018-09-11T15:36:32+5:30

सध्या मुंबईत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोच्या कामाला शासकीय परवानग्या आणि निधीची तरतूदही जलद गतीने करण्यात येत आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रोच्या मार्गासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले आहेत.

Decision in Cabinet meeting, approval for extension of this route of Mumbai Metro | मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मेट्रोच्या 'या' मार्गावरील विस्तारीकरणाला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मेट्रोच्या 'या' मार्गावरील विस्तारीकरणाला मंजुरी

Next

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील अनेक प्रश्न निकाली लावण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबईमेट्रोच्याही नवीन मार्गांच्या विस्ताराला मान्यता देण्यात आली. त्यानुसार मुंबई मेट्रो 9, मुंबई मेट्रो 7 म्हणजेच मेट्रो 7 महामार्गाच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी 6607 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. तसेच मुंबई मेट्रो 9 साठी निधी उभारण्यास एमएमआरडीएला विशेष अधिकारही दिले आहेत. इतर मार्गिकांप्रमाणेच समर्पित नागरी परिवहन निधी उभारण्यास ही मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोच्या या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 13.581 किलो मीटर असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम अधिक गतीने होणार आहे. 

* असा असेल मुंबई मेट्रो मार्ग 9
दहीसर ते मीरा भाईंदर 
लांबी - 10.41 किमी
स्थानके - 11 
पूर्णत: - उन्नत मार्ग

* मुंबई मेट्रो 7 अ
अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
लांबी - 3.175 किमी
0.98 किमी उन्नत मार्ग 
2.215 किमी भुयारी मार्गिका
 

Web Title: Decision in Cabinet meeting, approval for extension of this route of Mumbai Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.