The deceased woman has looted Rs 40 thousand by ATM | मूकबधिर महिलेने एटीएमद्वारे लुटले ४० हजार रुपये
मूकबधिर महिलेने एटीएमद्वारे लुटले ४० हजार रुपये

मुंबई : कुर्ला ते भांडुप रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेचे एटीएम एका मूकबधिर महिलेने चोरून एटीएमद्वारे ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. या घडलेल्या घटनेचा तपास करत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी त्या महिलेस अटक केली.


सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात लॅब असिस्टंट पदावर काम करणाºया सिंधू माने भांडुप येथे राहतात. ९ जानेवारी रोजी सायन रुग्णालय ते जीटीबी स्थानकापर्यंत त्यांनी पायी प्रवास केला. त्यानंतर हार्बर मार्गावरून जीटीबी आणि कुर्ला असा प्रवास केला. कुर्ला स्थानकावर उतरून त्यांनी भांडुपला जाणारी लोकल पकडली. यादरम्यान आरोपी नम्रता थोरात (२७) या मूकबधिर महिलेने सिंधू यांच्या पर्समधील ऐवज चोरी केला. सिंधू यांना याची कोणतीही कल्पना नव्हती. १० जानेवारी रोजी सकाळी मोबाइलवर ४० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. बँकेचे स्टेटमेंट घेऊन कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.


नम्रता थोरात हिने मुलुंड स्थानकाशेजारी एटीएममधून दोन वेळा १० हजार काढले. त्यानंतर शेजारीच असलेल्या दुसºया एटीएममधून ५ हजार काढले. नवीन ड्रेस, सोन्याची अंगठी, खाद्यपदार्थ खरेदी करून प्रत्येक ठिकाणी एटीएम कार्ड स्वॅप केले. याचा एकूण खर्च ४० हजार २०५ रुपये झाला. ही महिला मूकबधिर असल्याने ट्रान्सलेटरला बोलावून संभाषण करण्यात आले. अटक केल्यानंतर महिला आरोपीने गुन्हा कबूल केला. कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश संकपाळ, हवालदार सतीश पवार, रवी गोळे आणि स्वप्नाली गाडे यांनी गुन्ह्याची उकल करून आरोपीला पकडले.

एटीएमचा पासवर्ड कागदावरच लिहिलेला
तक्रारदार महिलेने एटीएमचा पासवर्ड पर्समधील कागदावरच लिहिलेला असल्याने महिला चोराला पैसे काढणे सोपे गेले.

असा केला तपास
कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर तपास सुरू केला. तक्रारदार महिलेला मोबाइलवर आलेले मेसेजचे स्थळ पाहून पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन तपास केला. ज्वेलरीच्या दुकानात, मॉलमध्ये जाऊ न सीसीटीव्ही फूटेज तपासले. तेव्हा सीसीटीव्ही फूटेजची वेळ आणि मेसेज येण्याची वेळ एकच असल्याने मूकबधिर महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या. १४ जानेवारीपर्यंत आरोपी महिलेला पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.


Web Title: The deceased woman has looted Rs 40 thousand by ATM
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.