वाहतूक दरवाढीने दैनंदिन वस्तू महागल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:35 AM2018-05-24T01:35:40+5:302018-05-24T01:35:40+5:30

इंधन दरवाढीचा परिणाम : वाहतूकदारांचे २० जुलैपासून देशव्यापी चक्काजाम आंदोलन

Daily commodities increased by traffic hikes | वाहतूक दरवाढीने दैनंदिन वस्तू महागल्या!

वाहतूक दरवाढीने दैनंदिन वस्तू महागल्या!

Next

मुंबई : पेट्रोल व डिझेल या इंधनांच्या वाढत्या दरांमुळे आता सर्वसामान्यांना अधिकच चटके सहन करावे लागणार आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक दर भडकले असून दैनंदिन जीवनातील वस्तूंचे दरही कडाडल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांवर ‘महंगाई मार गई’ म्हणण्याची वेळ आली आहे.
सरकारने इंधन दर आवाक्यात आणले नाहीत, तर २० जुलैपासून देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक वाहतूकदारांच्या केंद्रीय संघटनेने दिली आहे. सोबतच वाहतूकदारांची राज्यव्यापी संघटना बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने बुधवारी बैठक घेत या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. बीजीटीएचे सचिव अनिल विजन म्हणाले, संघटनेच्या पदाधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मशीद बंदर येथे पार पडली. त्यात इंधन दरांमध्ये झालेली वाढ शासनाने कमी केली नाही, तर चक्काजाम आंदोलनात सामील होण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. याआधीच गाडीचे स्पेअर पार्ट आणि टायर अशा वस्तूंचा समावेश केंद्र सरकारने चैनीच्या वस्तूंमध्ये केल्याने वाहतूकदारांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. सध्या २८ टक्के जीएसटी आकारणाºया सरकारने १२ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यात वाढत्या इंधन दरांमुळे वाहतूकदारांचे कंबरडे मोडल्याचे विजन म्हणाले.
इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. ते २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याची माहिती भायखळा भाजी मार्केट प्रिमायसेस सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली. ते म्हणाले, इंधन दर कमी केले नाही, तर भाज्यांचे दर दुपटीने वाढतील. तूर्तास फरस बी, भेंडी, वांगी, फ्लॉवर या भाजीपाल्याचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत.

भाजीपाल्याचे दर वाढले असले, तरी त्याचा फायदा शेतकºयांना होत नाही. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे शेतीपासून माल वाहतूक गाडीपर्यंत आणण्याचा खर्च आणि डिझेलच्या दरवाढीमुळे माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. यामुळे पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
- किरण झोडगे, अध्यक्ष-भायखळा भाजी मार्केट प्रिमायसेस सो. लिमिटेड

वाहतूकदारांच्या एकूण खर्चापैकी ७० टक्के खर्च इंधनावर होतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी मध्यस्थी करण्याचे आवाहन आमच्या संघटनेने केले आहे. इंधन दरवाढीच्या माध्यमातून सरकार वाहतूकदारांवर विषप्रयोग सुरू आहे.
- बाल मल्कित सिंग, अयक्ष-आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस कोअर कमिटी

इंधन दरात दैनंदिन वाढ होत असली, तरी वाहतूकदारांना रोजच्या रोज वाहतूक खर्चात वाढ करता येत नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. याशिवाय सामान्यांच्या भाजीपाला, दूध आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडतील, अशी शक्यता आहे.
- अनिल विजन, सरचिटणीस-बीजीटीए

मुंबई काँग्रेस इंधन दरवाढीविरोधात गुरुवारी, २४ मे रोजी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. कलिना येथून सकाळी ११ वाजता तो सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देईल.
- सजंय निरुपम, अध्यक्ष-मुंबई काँग्रेस

Web Title: Daily commodities increased by traffic hikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.