मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवर साडेसात लाखांंचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:06 AM2018-12-26T05:06:49+5:302018-12-26T05:07:04+5:30

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत मुंबई विद्यापीठाने जवळपास साडेसात लाख रुपये खर्च केल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत उघडकीस आले आहे.

 The cost of 14 million rupees for the election of the University of Mumbai | मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवर साडेसात लाखांंचा खर्च

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवर साडेसात लाखांंचा खर्च

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत मुंबई विद्यापीठाने जवळपास साडेसात लाख रुपये खर्च केल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत उघडकीस आले आहे. यात सर्वाधिक खर्च प्रवास व त्यानंतर जाहिरातीवर करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाºया १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीसाठी झालेल्या निवडणूक खर्चाची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे २७ मार्च २०१८ रोजी माहिती अधिकाराअंतर्गत मागितली होती. त्यांच्या अर्जाला तब्बल ९ महिन्यांनंतर मुंबई विद्यापीठाने उत्तर देत माहिती दिली.
मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाचे उप कुलसचिव राजेंद्र आंबवडे यांनी अनिल गलगली यांस कळविले की, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाºया १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत ७ लाख ४४ हजार ४९९ रुपये खर्च झाले आहेत.
मात्र, माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागविल्यानंतरच झालेल्या खर्चाचा आकडा समोर आला आहे. प्रत्यक्षात अधिसभा निवडणुकीचा खर्च आणि त्याची संपूर्ण माहिती मुंबई विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
याबाबत राज्यपाल विद्यासागर राव तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना लेखी पत्र पाठवून तशी मागणी केल्याचे गलगली यांनी सांगितले.

प्रवासासाठी खर्च झाले सर्वाधिक पैसे

निवडणुकीवर झालेल्या एकूण खर्चापैकी सर्वाधिक ३ लाख २२ हजार ८९ रुपये एवढा खर्च प्रवासावर झाला आहे. त्यानंतर जाहिरातीवर २ लाख ४३ हजार २३२ रुपये, सॉफ्टवेअरसाठी ६८ हजार ८१० रुपये, टोनर रीफिलिंगसाठी १६ हजार ६३८, डेकोरेशनसाठी २० हजार ५००, ट्रेनिंग वोट काउंटिंगसाठी ३ हजार ३३० रुपये तर, आदरातिथ्यासाठी (हॉस्पिटॅलिटी) ६९ हजार ९०० रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Web Title:  The cost of 14 million rupees for the election of the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.