नगरसेवकांना हवी मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:57 AM2018-02-09T01:57:42+5:302018-02-09T01:58:03+5:30

आमदारांना राज्य सरकारकडून मानधनबरोबरच निवृत्तिवेतन, निवासस्थान, गाडी प्रवास, विमान प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता मिळत असतो.

Corporates want to increase their mentality | नगरसेवकांना हवी मानधनात वाढ

नगरसेवकांना हवी मानधनात वाढ

Next

मुंबई : आमदारांना राज्य सरकारकडून मानधनबरोबरच निवृत्तिवेतन, निवासस्थान, गाडी प्रवास, विमान प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता मिळत असतो. मात्र मतदारांच्या दैनंदिन सुविधांसाठी तत्पर असलेल्या नगरसेवकांनीच मागे का राहावे? मतदारांच्या सेवेच्या मोबदल्यात मिळत असलेले मानधन नगरसेवकांना पुन्हा कमी पडू लागले आहे. त्यामुळे आमचा पगारही वाढवा, अशी मागणी पुन्हा एकदा नगरसेवकांकडून पुढे आली आहे.
मुंबई महापालिकेत २२७ प्रभागांचे प्रतिनिधित्व करणारे व पाच स्वीकृत असे २३२ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना दरमहा २५ हजार रुपये मानधन, विविध समित्यांमध्ये उपस्थित राहण्याचे प्रति बैठक दीडशे रुपये, मोबाइल व १२०० रुपयांपर्यंत बिल भरले जाते. गेली काही वर्षे १० हजार रुपये मानधनात वाढ करण्याची मागणी होत होती. गेल्याच वर्षी ही वाढ मंजूर करीत २५ हजार रुपये करण्यात आली.
महागाई भत्ता वाढला की आमदारांचे मानधन वाढते. स्थानिक पातळीवर सोयी-सुविधा पुरविण्याचे काम नगरसेवक करीत असतात. यासाठी त्यांना प्रवास करावा
लागतो. अतिवृष्टी, इमारत पडणे, आग लागणे अशा दुर्घटनेच्या वेळी नगरसेवक मदतीला धावून जातो.
मात्र आमदारांना मिळणाºया सव्वा लाख मानधनाच्या तुलनेत नगरसेवकांचे २५ हजार रुपयांचे मानधन तुटपुंजे आहे. त्यामुळे राज्य सरकार जेव्हा जेव्हा मानधनात वाढ करेल, तेव्हा तेव्हा नगरसेवकांचेही मानधन वाढवा, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी पालिका महासभेत केली आहे.
>नगरसेवकांना
काय-काय मिळते?
नगरसेवकांना दरमहा २५ हजार रुपये मानधन, पालिका महासभेच्या प्रत्येक बैठकीचे मिळून चारशे ते सहाशे रुपये, इतर समित्यांच्या बैठकांचे मानधन मिळत असते. तसेच २००७पासून लॅपटॉप देण्यात येत आहेत. मोबाइल फोन व १२०० रुपयांपर्यंत बिलाची रक्कम.
>प्रलंबित मागण्या
नगरसेवकांना निवृत्तिवेतन, विमा योजनांचा लाभ, जलतरण तलावाचे मोफत सदस्यत्व, कार्यालयासाठी तसेच घरासाठी भूखंड, मुंबईतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, वांद्रे-वरळी समुद्रसेतूवरून मोफत प्रवास अशा मागण्या यापूर्वी करण्यात आल्या आहेत.

Web Title: Corporates want to increase their mentality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.