काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण; मनसे नेते संदीप देशपांडे यांना अखेर जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, December 08, 2017 4:31am

काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठही जणांना अखेर गुरुवारी जामीन मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

मुंबई : काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह आठही जणांना अखेर गुरुवारी जामीन मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सलग चार दिवस त्यांनी आर्थर रोड कारागृहात काढले. १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी १ डिसेंबरला काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिल्ले, विशाल कोकणे, हरीश सोळुंकी आणि दिवाकर पडवळ यांना अटक केली. ४ डिसेंबरला त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आठही जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यांमध्ये ४५२ या अजामीनपात्र कलमामुळे बुधवारी त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. मात्र, गुरुवारी सत्र न्यायालयाने गुन्ह्याअंतर्गत आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर आठवड्याला पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली आहे.

संबंधित

हरुनही राहुल गांधी जिंकले! राज ठाकरेंनी काढला निष्कर्ष
मनसेचा 'पद्मावत'ला पाठिंबा; संरक्षणासाठी सज्ज !
बाजूने लिहिणारे भक्त; विरोधी देशद्रोही! व्यंगचित्रकार संमेलनात राज ठाकरे याचे ‘फटकारे’
मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल मटाले यांची नियुक्ती
महापालिका कृष्णकुंज बाहेर बसवणार फेरीवाल्यांना, राज ठाकरेंनी घेतली महत्वाची बैठक

मुंबई कडून आणखी

पद्मावतच्या मार्गातील 'विघ्न' टळण्यासाठी दीपिका पोहोचली सिद्धिविनायकाच्या चरणी
कोरेगाव-भीमा घटनेमागचे अदृश्य हात सापडले तर त्यांची होळी करु - उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेतेपदी, कार्यकारिणी बैठकीत अधिकृत घोषणा
अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवा, उद्धव ठाकरेंचं मोदींना आव्हान
छाती 56 इंचाची असून उपयोग नाही, त्यात शौर्य असावं लागतं- उद्धव ठाकरे

आणखी वाचा